बर्थडे स्पेशल- बालकलाकार म्हणून नागार्जुन यांनी केलेली करिअरला सुरुवात, 'या' महिला खेळाडूला दिली होती ७३ लाखांची कार गिफ्ट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 29 August 2020

नागार्जुन अक्किनेनी एक उत्तम अभिनेता असण्यासोबतंच सिने निर्माता आणि व्यावसायिक देखील आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी

मुंबई- साऊथ सिनेमांचे सुपरस्टार अभिनेता नागार्जुन अक्किनेनी यांचा आज वाढदिवस. त्यांनी साऊथ सिनेमांव्यतिरिक्त बॉलीवूडच्या अनेक सिनेमात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नागार्जुन अक्किनेनी एक उत्तम अभिनेता असण्यासोबतंच सिने निर्माता आणि व्यावसायिक देखील आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी

हे ही वाचा:  'पोल्का प्रिंट ड्रेस आणि प्रेग्नंसी कनेक्शन', अनुष्का शर्माच्या ड्रेसवरुन मजेदार मीम्स व्हायरल

नागार्जुन अक्किनेनी यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५९ रोजी मद्रासमध्ये झाला. ते प्रसिद्ध कलाकार अक्किनेनी नागेश्वर राव यांचा मुलगा आहे. सिने कुटुंबातील असल्यामुळे नागार्जुन यांना सुरुवातीपासूनंच सिनेमाची आवड होती. त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेमांमध्ये एंट्री केली. नागार्जुन यांनी बराच काळ बालकलाकार म्हणून काम केलं आणि खूप प्रसिद्धी मिळवली. नागार्जुन अक्किनेनी यांनी मुख्य अभिनेता म्हणून 'विक्रम' या सिनेमातून पदार्पण केलं. १९८६ मध्ये त्यांचा हा सिनेमा रिलीज झाला होता. त्याचवर्षी नागार्जुन यांनी 'कॅप्टन नागार्जुन' आणि 'अरन्याकांडा' या सिनेमात अभिनय केला होता. या तीनही सिनेमांना प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. 

7 best Hindi films of Nagarjuna | Filmfare.com

नागार्जुन यांची दोन लग्न झाली आहेत. १९८४ मध्ये त्यांनी लक्ष्मी दगुबत्तीसोबत लग्न केलं मात्र १९९० मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर १९९२मध्ये त्यांनी अमला अक्किनेनीसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं नागा चैतन्य आणि अखिल अक्किनेनी आहेत. दोघेही प्रसिद्ध अभिनेते आहेत.

Everything is not right in Nagarjuna's house, is not happy Samantha  Akkineni? | Kajrii.com Lifestyle Book

गेल्या वर्षी नागार्जुन चर्चेत होते ते प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूला ७३ लाखाची नवीन गाडी बीएमडब्ल्यु एक्स ५ भेट म्हणून दिल्याने. पी. व्ही. सिंधू 'बीडब्ल्युएफ वर्ल्ड चँपियनशिप'मध्ये गोल्ड मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू होती. याचनिमित्ताने नागार्जुन यांनी सिंधूला ही कार गिफ्ट म्हणून दिली होती. हा कार्यक्रम हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये झाला होता.   

नागार्जुन

akkineni nagarjuna birthday special know unknown facts about him  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akkineni nagarjuna birthday special know unknown facts about him