Akshay Kelkar: व्हिलन नाय हा तर हिरो! अक्षयचा मनोरंजन विश्वातील प्रवास.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kelkar 
 Bigg Boss Marathi 4

Akshay Kelkar: व्हिलन नाय हा तर हिरो! अक्षयचा मनोरंजन विश्वातील प्रवास..

गेल्या तीन महिन्यापासून घराघरात गाजत असलेल्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी शोची अखेर सांगता झाली. गेल्या ९९ दिवसांत या खेळाने आपले भरभरून मनोरंजन केल. अक्षय केळकर बिग बॉस मराठी सिझन ४ विजेता झाला. आज त्याची ओळख बिग बॉस सिझन ४ चा विजेता असली तरी या आधी अक्षय केळकरच्या मराठी सिरियल ते हिंदी सिरीयलधला प्रवास वरही एक नजर टाकूया .

हेही वाचा: Bigg Boss 4 Marathi : 'अक्षय'नं कोरलं बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव

अक्षय केळकरने २०१३ मध्ये त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अक्षयने २०१४ मध्ये स्टार प्रवाहच्या “बे दुने दाह” या मालिकेद्वारे मराठी टेलिव्हिजनवर पहिले पाऊल टाकले, ज्यामध्ये त्याने कबीरची भूमिका केली होती. ईटीव्ही मराठीवर प्रसारित होणाऱ्या “कमला” मालिकेतही त्याने भूमिका साकारली होती.

त्यानंतर अक्षयने २०१६ मध्ये “कॉलेज कॅफे” चित्रपटातही भूमिका केली होती. २०१८ मध्ये, त्याने सहकलाकार शरद केळकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासह “माधुरी” नावाच्या मराठी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली.

हेही वाचा: Bigg boss marathi: अक्षय केळकरने कोरले बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव, मिळाली इतकी रक्कम

आतापर्यंत अक्षयने सहकलाकार म्हणून काम केले पण अक्षयला खरा लीड रोल मिळाला तो हिंदी टेलिव्हिजनवर सब टीव्हीच्या विनोदी मालिका “भाखरवडी” मध्ये . या मालिकेत त्याने अभिषेकची भूमिका साकारली होती.

हेही वाचा: Akshay Kelkar: रिक्षाचालकाचा मुलगा ते बिग बॉसचा विजेता...खरचं अक्षय तु कमाल

भाकरवाडी मधील भूमिका केल्यानंतर तो प्रसिद्ध झाला आहे. त्याने राज मसाले, मॅट्रिमोनियल साइट्स तुमच जमला, पवित्रविवाह डॉट कॉम आणि TVC सारख्या जाहिरातींमध्येही काम केले.

मालिका आणि चित्रपटांसोबतच अक्षयने यूट्यूब वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्यातील काही फुल टाइट, दोन कटिंग, गोष्ट तरुण पिढीची, बँग बँग. इतकेच नव्हेतर अक्षयने सोनी हिंदीमध्ये क्राईम पेट्रोलमध्ये अनेक नकारात्मक भूमिकाही केल्या आहेत.