अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' सिनेमाचा सेट 'या' कारणामुळे केला जाणार जमीनदोस्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'पृथ्वीराज' या सिनेमाशी संबंधित एक वाईट बातमी आहे.अक्षय कुमारच्या आगामी 'पृथ्वीराज' सिनेमाचा सेट आता उध्वस्त केला जाणार आहे.

मुंबई- देशभरात लॉकडाऊन सुरु असल्याने मनोरंजन विश्वातील सर्व शूटींग्स बंद ठेवण्यात आली आहेत. बॉलीवूडच्या खिलाडी कुमारने नुकतंच केंद्र सरकारच्या कोरोना जागरुकतेविषयीच्या अभियानाचं शूट सर्व नियम पाळून केलं आहे. सगळ्यांनाच माहित आहे की अभिनेता अक्षय कुमार वर्षभरात ७ ते ८ सिनेमे रिलीज करतो. त्यामुळे या वर्षी अक्षयच्याच सिनेमांना सर्वात जास्त फटका बसला आहे. असंच काहीसं झालं आहे ते अक्षयच्या 'पृथ्वीराज' या सिनेमाच्या बाबतीत. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'पृथ्वीराज' या सिनेमाशी संबंधित एक वाईट बातमी आहे.

हे ही वाचा: दीपिकाने लाईव्ह चॅट दरम्यान केली रणवीरची पोल-खोल, रणवीर म्हणाला 'तु थांब जरा दीपिका'

कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे लॉकडाऊनमध्ये सिनेइंडस्ट्रीचं प्रचंड नुकसान झालं आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या 'सुयंवंशी' सिनेमाव्यतिरिक्त या वर्षी त्याचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते मात्र ते आता पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यातंच अक्षय कुमारच्या आगामी 'पृथ्वीराज' सिनेमाचा सेट आता उध्वस्त केला जाणार आहे. आणि याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जवळ येत असलेला जून महिना.

सिनेमातील 'पृथ्वीराज पॅलेस' लवकरंच जमीनदोस्त केला जाणार आहे. पावसाळ्यामुळे सेटची नासधुस होऊ नये या कारणामुळे हा पॅलेस जमीनदोस्त करण्याचा निर्णय सिनेमाची टीम घेत असल्याचं कळतंय.

सिनेमाशी संबंधित सुत्राने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीत, 'हा सेट दोन महिने तसाच्या तसा ठेवला होता. सद्यपरिस्थिती लवकर निवळेल असं वाटल्याने हा सेट पाडला गेला नाही मात्र आता जुन सुरु होण्यासाठी काहीच दिवस राहिले असल्याने आता हा सेट वाचवणं शक्य होणार नाही.'

इतकंच नाही तर या सुत्राने पुढे असंही सांगितलं की, 'निर्माते सध्या सेट हटवण्यासाठी परवानगी घेत आहेत. अक्षयने लॉकडाऊनची घोषणा होण्याआधी दहिसरमध्ये असलेल्या या सेटवर सिनेमातील महत्वाचा भाग शूट केला होता. मात्र अजुनही असे काही महत्वाचे सीन इथे शूट करणं बाकी आहे.' 

Akshay Kumar will start preparations on 'Prithviraj Chauhan' Very ...

आता असं कळतंय की जेव्हा पुन्हा शूटींग सुरु केली जाईल तेव्हा हा सेट इनडोअर लावला जाईल. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा 'पृथ्वीराज' हा सिनेमा यावर्षी दिवाळी दरम्यान रिलीज करण्याचं ठरलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती पाहता कदाचित याची तारीख पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.    

akshay kumar and manushi chhillar starrer prithviraj palace set will be demolished  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar and manushi chhillar starrer prithviraj palace set will be demolished