अक्षय व राधिकाची सायकल स्वारी 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षय कुमार आणि अभिनेत्री राधिका आपटे महेश्वरमध्ये सायकल स्वारी करताना दिसले. त्यांना पाहून सगळेच थक्क झाले. हे इकडे काय करत आहेत, असा प्रश्‍न त्यांना पडला; तर हे दोघे सध्या त्यांचा आगामी चित्रपट "पॅडमॅन'चे चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांनी महेश्वर किल्ल्याच्या येथून या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली आणि अक्षयने राधिकाला सायकलवर बसवून नर्मदा घाटात फिरवत असल्याचे चित्रीकरण केले. "तू मॉंगे सर्दी विच अमिया, तू मॉंगे गर्मी विच फलिया, तू बारीश में अगर कह दे...' असे या गाण्याचे बोल आहेत.

बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो अक्षय कुमार आणि अभिनेत्री राधिका आपटे महेश्वरमध्ये सायकल स्वारी करताना दिसले. त्यांना पाहून सगळेच थक्क झाले. हे इकडे काय करत आहेत, असा प्रश्‍न त्यांना पडला; तर हे दोघे सध्या त्यांचा आगामी चित्रपट "पॅडमॅन'चे चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांनी महेश्वर किल्ल्याच्या येथून या चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली आणि अक्षयने राधिकाला सायकलवर बसवून नर्मदा घाटात फिरवत असल्याचे चित्रीकरण केले. "तू मॉंगे सर्दी विच अमिया, तू मॉंगे गर्मी विच फलिया, तू बारीश में अगर कह दे...' असे या गाण्याचे बोल आहेत. या चित्रपटाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. त्यामुळे या गाण्यात अक्षय स्लीपर घालून सायकल चालविताना दिसतो आहे. 

Web Title: akshay kumar and radhika apte