रक्षाबंधनादिवशी अक्षय कुमारनं आपल्या बहिणीला दिली 'ही' खास भेट

रक्षाबंधनादिवशी अक्षय कुमारनं आपल्या बहिणीला दिली 'ही' खास भेट

मुंबई: काहीच दिवसांपूर्वी आनंद एल. राय यांनी अक्षय कुमारसोबतचा आपला पहिला चित्रपट "अतरंगी रे" ची घोषणा केली. आता रक्षाबंधन उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आनंद एल. राय यांनी अक्षयसोबत आणखीन एक चित्रपट करत असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. या नव्या  चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 

"अतरंगी रे" चित्रपटानंतर चित्रपट निर्माते आनंद एल. राय आणि सुपरस्टार अक्षय कुमार पुन्हा एकदा "रक्षाबंधन" या चित्रपटातून एकत्र येत आहेत. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक हिमांशु शर्मा यांनी केले आहे, ज्यांनी "झिरो", "तनु वेड्स मनु" फ्रेंचायझी आणि "रांझणा" सारखे चित्रपट देखील लिहिले आहेत. 

रक्षाबंधन या सणाच्या दिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाच्या पोस्टरवरून असे दिसून येते की, हा कौटुंबिक चित्रपट असेल आणि पोस्टरमधून भावा-बहिणीचे प्रेम दाखवले आहे. या चित्रपटाचे निर्माते आनंद एल. राय यांच्या अतरंगी रे या चित्रपटात अक्षय कुमार सोबतच दाक्षिणात्य सुपरस्टार्स धनुष आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. हे पाहणे रोमांचक होईल.  

याबाबत निर्माते आनंद एल. राय यांनी म्हटले आहे की, "अक्षय खूप प्रतिभावान अभिनेता आहे आणि मी पुन्हा एकदा "रक्षाबंधन "साठी त्याच्याबरोबर काम करण्यास अधिक उत्सुक आहे. या चित्रपटाची कथा खूप खास आहे. यात एक सुंदर प्रकारे फुलणारे भावा- बहिणीचे नाते दाखवले आहे. जीवनात अशी क्वचितच एखादी कहाणी असते जी तुमच्या मनाला इतके खोलवर आणि सहज स्पर्श करते. ही कहाणी तुम्हाला हसवेलही आणि  रडवेलही.

‘रक्षाबंधन’ हा चित्रपट अक्षयने आपली बहीण अलका भाटियाला रक्षाबंधनाची भेट म्हणून दिला आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षापासून सुरू होणार आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Akshay Kumar announced new film Raksha Bandhan dedicates sister Alka 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com