बर्थडे स्पेशल: ज्या बंगल्याबाहेर फोटोशूटसाठी अक्षय कुमारला वॉचमनने दिला होता नकार त्याच आलिशान बंगल्याचा आज आहे मालक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 9 September 2020

अक्षय कुमारने १० वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्या वडिलांकडे हट्ट करत मार्शल आर्ट शिकण्यासाठी बँकॉकला गेला होता. आणि तिथे त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला होता.

मुंबई- बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षयचा आज ९ सप्टेंबर रोजी वाढदिवस. अक्षयचा जन्म दिल्लीतील चांदनी चौकमध्ये झाला होता. त्याचे वडिल आधी आर्मीमध्ये होते त्यानंतर ते अकाऊंटंटची नोकरी करत होते.काही काळानंतर अक्षयचं कुटुंब दिल्लीतून मुंबईमध्ये शिफ्ट झालं. इथे अक्षयने माटुंगामधील डॉन बॉस्को शाळेत त्याचं काही शिक्षण पूर्ण केलं. अक्षयला वेगवेगळे खेळ खेळण्याची जास्त आवड होती.  

हे ही वाचा: एकता कपूरच्या माफीनाम्यानंतरही नाराज प्रेक्षकांची तिच्या घरावर दगडफेक  

अक्षय कुमारला खिलाडी हे नाव लहानपणापासूनंच शोभत होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शेजारच्या मुलाला कराटे खेळताना पाहून त्याच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. १० वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच्या वडिलांकडे हट्ट करत तो मार्शल आर्ट शिकण्यासाठी बँकॉकला गेला होता. आणि तिथे त्याने ब्लॅक बेल्ट मिळवला होता. पाच वर्षांनंतर कोलकाता-ढाकामध्ये ट्रॅवल एजंट, हॉटेलचं काम करत तो दिल्लीला पोहोचला. दिल्लीमध्ये त्याने काही काळ कुंदनची ज्वेलरी खरेदी करत मुंबईमध्ये विकली. 

एका मुलाखतीत अक्षयने सांगितलं होतं की 'कोणाच्यातरी सल्ल्यावरुन त्याने मॉडलिंग करायला सुरुवात केली होती. फर्नीचरच्या दुकानात शूट झालेल्या पहिल्या फोटोशूटसाठी त्याला २१ हजार रुपयांचा चेक मिळाला होता. एका मॉडेल कॉरेडिनेटरला त्याचे फोटो दाखवताना तिथे त्याला प्रमोद चक्रवर्ती भेटले. फोटो पाहून ते म्हणाले सिनेमा करशील? त्याने हो म्हणताच त्याला पाच हजाराचा चेक मिळाला होता.'

अक्षयचं खर नाव राजीव भाटिया आहे. त्याने एकेदिवशी सहजच त्याचं नाव बदलून अक्षय कुमार केलं होतं. योगायोग असा की त्याने त्याचं नाव बदलताच दुस-या दिवशी त्याला मुख्य अभिनेता म्हणून पहिला सिनेमा मिळाला. १९९१ मध्ये 'सौगंध' हा तो सिनेमा होता. अक्षय आज भलेही बॉलीवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक असेल मात्र मॉडलिंग दरम्यान त्याला बराच संघर्ष करावा लागला होता.

Shah Rukh Khan to Akshay Kumar, 9 Bollywood celeb houses that will make you  feel poor AF

असाच एक किस्सा म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये एका घराबाहेर अक्षय त्याचं फोटोशूट करत होता तेव्हा त्याला त्या घराच्या जवळ फोटोशूट करायचं होतं मात्र वॉचमनने त्याला जाऊ दिलं नाही. नंतर अक्षयने तोच बंगला खरेदी केला. अक्षय पत्नी ट्विंकल आणि दोन मुलं आरव, नितारासोबत याच आलिशान घरात राहतो. त्याचं घर समुद्राच्या किना-यावर आहे. घराचं इंटेरियन ट्विंकलने डिझाईन केलं आहे.   

akshay kumar birthday special here his struggle story during modeling  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar birthday special here his struggle story during modeling