esakal | आईच्या निधनाच्या 2 दिवसानंतर अक्षय कुमार 'बॅक टू वर्क'! 'या' प्रोजेक्टवर करणार काम
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar

आईच्या निधनाच्या २ दिवसानंतर अक्षय कुमार परतणार बॅक टू वर्क!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : सुप्रसिध्द अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) आई अरुणा भाटिया (Aruna Bhatia death) यांचे बुधवारी (ता.८) निधन झाले. त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवसाआधी त्याच्या आईने या जगाचा कायमचा निरोप घेतला होता. यानंतर सोशल मिडियावर त्याच्या चाहत्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षय नेहमीच इंडस्ट्रीमधील सर्वात मेहनती कलाकारांपैकी एक आहे. अक्षयची आपल्या कामाप्रती किती निष्ठा आहे. हे सर्वांनाच माहित आहे. सुत्रांच्या माहितीनुसार अक्षय शुक्रवारी (ता.१०) कामावर परतणार असल्याचं समजत आहे.

यूकेला परतणार अक्षय

अक्षय कुमारने स्वतः सोशल मिडियावर आईच्या निधनाची बातमी दिली होती. यात तो म्हणाला होता, 'ती माझा कणा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई अरुणा भाटिया यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे आणि ती माझ्या वडिलांकडे दुसऱ्या जगात गेली आहे. या कठीण काळात माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती.' सुत्रांच्या माहितीनुसार आज (ता.१०) अक्षय यूकेला परतणार आहे. तिथे तो निर्माता वासु भगनानीसोबत त्यांच्या नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. आणि आता तो वासु यांच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार आहे.

loading image
go to top