Akshay Kumar News: इथेही फ्लॉपच...! अमेरिकेत तिकीट विक्री कमी झाल्याने अक्षय कुमार ची एंटरटेनमेंट टूर झाली रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kummar, akshay kumar entertainment tour

Akshay Kumar News: इथेही फ्लॉपच...! अमेरिकेत तिकीट विक्री कमी झाल्याने अक्षय कुमार ची एंटरटेनमेंट टूर झाली रद्द

Akshay Kumar News: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या फ्लॉप सिनेमांमुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारचा नुकताच रिलीज झालेला सेल्फी हा नवीन सिनेमा सुद्धा फ्लॉप झालाय.

अक्षय कुमार सध्या त्याच्या एंटरटेनमेंट टूर मुळे चर्चेत आहे. पण इथेही अक्षयला अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. अक्षय कुमारच्या एंटरटेनमेंट टूरला (entertainment tour) मोठा फटका बसलाय.

(akshay kumar entertainment tour cancelled in US due to poor ticket sales)

अक्षय कुमार सध्या नोरा फतेही, अपारशक्ती खुराना, दिशा पटनी, मौनी रॉय या कलाकारांना घेऊन एंटरटेनमेंट टूर घेऊन परदेशात गेलाय. अमेरिकेत अक्षय कुमार हि टूर घेऊन जाणार होता. न्यू जर्सी मध्ये अक्षयची हि टूर होणार होती.

परंतु अगदीच कमी तिकीट विक्री झाल्याने अक्षयला हि एंटरटेनमेंट टूर रद्द करावी लागतेय. याविषयी US आयोजकांनी भलं मोठं पात्र लिहून दिलगिरी व्यक्त केलीय.

US आयोजकांनी त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये म्हटलं ते कि, "आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा फार उंचीवर नेऊन ठेवल्या होत्या. आम्ही दरवेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काहीवेळेस गोष्टी आपल्या बाजूने येत नाहीत.

काही वेळेस आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. यावेळी सुद्धा असंच काहीसं घडलं असून आम्हाला आमच्या प्रेक्षकांना निराश करावे लागत आहे आणि अक्षय कुमार 'एंटरटेनर्स टूर' शो रद्द करण्याची घोषणा करावी लागत आहे."

Akshay Kumar News

Akshay Kumar News

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार त्याच्या एंटरटेनमेंट टूर मुळे ट्रोल सुद्धा झालेला. अक्षय आणि नोरा फतेहीने एक डान्स केलेला. दोघं स्टार एकत्र मिळून जोरदार ठुमके लगावताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत नोरा फतेही आणि अक्षय कुमार 'सेल्फी' सिनेमातील 'मै खिलाडी..तू अनाडी..' गाण्यावर थिरकताना दिसले. अक्षयने घागरा घालून डान्स केला. म्हणून त्याला फॅन्सच्या टीकेला सामोरं जावं लागलं.

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमार - इम्रान हाश्मीचा 'सेल्फी' सिनेमा रिलीज झाला. 'सेल्फी' सिनेमाची तर बॉक्स ऑफिसवर खूपच दयनीय अवस्था झालेली पहायला मिळाली.

हा सिनेमा अक्षय कुमारच्या सबंध करिअर मधला सगळ्यात मोठा फ्लॉप सिनेमा म्हणून जाहीर करण्यात आला. अक्षय कुमार सध्या हेरा फेरी ३ सिनेमाचं शूटिंग करत आहे.

टॅग्स :Entertainmentakshay kumar