
अक्षयला लातूरहून भेटायला आला रिअल लाईफ 'बच्चन पांडे';काय आहे साम्य?
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'बच्चन पांडे'(Bachchhan Paandey) लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं अक्षय आणि कृती सनन थेट पोहोचले ते 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) च्या मंचावर. आणि तिथे अक्षयसाठी थेट लातूरहून एक स्पेशल भेट आली होती. काय होतं त्या लातूरच्या भेटीत. चला सविस्तर जाणून घेऊया. बच्चन पांडे सिनेमाच्या प्रमोशनचा श्रीगणेशा मराठमोळा कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मधनं करण्यात आला. तिथे अक्षय कुमारला भेटण्यासाठी एक धनंजय नावाचा चाहता लातूरहून खास आला होता. धनंजय स्वतःला रीअल लाईफ 'बच्चन पांडे' म्हणतो. त्याचं कारणही खास आहे. सिनेमात जसा अक्षयचा एक डोळा निळ्या स्टोनचा बनलेला आहे अगदी तसाच धनंजयचा एक डोळा निळ्या स्टोनचा आहे. हे सर्वात मोठं साम्य आहे रीअल आणि रील लाईफ बच्चन पांडेत.
हेही वाचा: महिला दिनी कतरिनानं मानले आईचे आभार; बहिणींच्या आठवणीत झाली नॉस्टॅल्जिक
'बच्चन पांडे' सिनेमाच्या ट्रेलरला रीलीजनंतर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. अक्षयनं साकारलेला 'बच्चन पांडे' आतापर्यंत ट्रेलरच्या माध्यमातून लोकांच्या पसंतीस उतरलाच आहे. पण त्याच्यासोबत सिनेमात गोड गोजिरी कृती सनन देखील दिसणार आहे. अर्शद वारसी,पंकज त्रिपाठी,संजय मिश्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जॅकलिन फर्नांडिसही सिनेमात आहे बरं का. साजिद नाडियादवालानं सिनेमाची निर्मिती केली आहे. 'बच्चन पांडे' १८ मार्च,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित केला जाणार आहे.
Web Title: Akshay Kumar Fan From Laturreal Life Bachchhan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..