अक्षय कुमारने केली मसक्कलीची 'अशी' सेवा! ; व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

अक्षय कुमारनेही आपला विश्रांतीचा वेळेचा व्हिडीओ आपल्या चाहत्यांशी सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे. या विश्रांतीच्या वेळेतही मात्र अक्षय कुणाची तरी सेवा करत आहे!

बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार सध्या जैसलमेर येथे सध्या 'हाउसफुल 4' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून विश्रांतीसाठी वेळ काढत सेलेब्रिटी नेहमीच दिसतात. अक्षय कुमारनेही आपला विश्रांतीचा वेळेचा व्हिडीओ आपल्या चाहत्यांशी सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे. या विश्रांतीच्या वेळेतही मात्र अक्षय कुणाची तरी सेवा करत आहे!

या व्हिडीओत अक्षय हा जमिनीवर बसला आहे. मसक्कली प्रजातीतील एका कबुतराला अन्न भरविण्यासाठी अक्षयने आपल्या हातावर दाने ठेवले आहे. हे दाने ही मसक्कली टिपत आहे आणि अक्षय मात्र अगदी जाणीवपुर्वक न हलता एकाच मुद्रेत जमिनीवर बसून आहे!

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

‪Finished shooting for the day and unwinding with this little fellow...wishing you all a good weekend ‬

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरुन अक्षयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ पस्तीस लाखाचेवर बघितला गेला आहे. ज्या परिसरात हा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला आहे, त्याच परिसरातील आणखी एक व्हिडीओ अक्षयने याआधीही शेअर केला होता. ज्यात रुद्राक्षाची एक मोठी माळ गळ्याभोवती फिरवताना अक्षय दिसला आहे. 
 

 

लवकरच अक्षय कुमारचा '2.0' हा रजनीकांत सोबतचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्यात अक्षयने नकारात्मक भूमिका साकारली आहे. सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला आहे.
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar Feeding Masakali Pigeons In Jaisalmer During Housefull Four Shoot Video