अक्षय कुमारच्या 'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

भारत स्वतंत्र झाल्यानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला हॉकी टिमनं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. पण फार हलाखीच्या परिस्थितीत भारताने मिळवलेल्या या यशाची 'गोल्ड' ही कहानी आहे.  

मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' या सिनेनाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. 12 ऑगस्ट 1948 ला स्वतंत्र भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे.

देशात अशांतता आणि अराजकता माजली असताना हॉकी टिमसाठी एकएका खेळाडूला एकत्र करुन भारताचं सुवर्ण जिंकण्याचं स्वप्नं तपन दास म्हणजेच अक्षय कुमार पुर्ण करतो. या सिनेमात हॉकी टिमचा सहाय्यक व्यवस्थापक म्हणून अक्षयने तपन दास ही प्रमुख भूमिका निभावली आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला हॉकी टिमनं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. पण फार हलाखीच्या परिस्थितीत भारताने मिळवलेल्या या यशाची 'गोल्ड' ही कहानी आहे.  

रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि अक्षय कुमार या तिघांनी मिळून 'गोल्ड' सिनेमाची निर्मिती केली आहे. रीमा कागती यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमातून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूड डेब्यू करत आहे. शिवाय विनीत सिंग, अमित साध, कुणाल कपूर, सनी कौशल यांचीही सिनेमात भूमिका आहे. 

सोशल मिडीया वरुन अक्षय कुमारने 'गोल्ड'चा ट्रेलर शेअर केला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला 'गोल्ड' प्रदर्शित होणार आहे. 
 

'गोल्ड'चा ट्रेलर -


आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay Kumar Flim Gold Trailer Release