अक्षय कुमारचे एक नव्हे तर तब्बल चार बिग बजेट चित्रपट लांबणीवर, थेट पुढील वर्षीच होणार प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

वर्षाला पाच ते सहा चित्रपट करणाऱ्या अक्षयचे यावर्षी चार बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार होते. मात्र आता त्यातील एकही चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकणार नाही.

मुंबई : कोरोना विषाणू दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूची ही साखळी तोडण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाउन करण्यात आले आहे, जे आता चौथ्या टप्प्यात पोहचले आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. चित्रपट समीक्षकांच्या म्हणण्यानुसार लॉकडाऊनमध्ये बॉलिवूडचे जवळजवळ 25 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. बरेच चित्रपट पुढे ढकलण्यात आले आहेत तर काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण न झाल्याने अनेक चित्रपट रखडले आहेत. अशातच या कोरोनाचा सर्वात मोठा फटका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला ही बसला आहे.

हे ही वाचा - लॉकडाऊननंतर रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' नाही तर 'हा' सिनेमा आधी होऊ शकतो रिलीज 

वर्षाला पाच ते सहा चित्रपट करणाऱ्या अक्षयचे यावर्षी चार बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार होते. मात्र आता त्यातील एकही चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकणार नाही. ज्यामध्ये 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बॉम्ब', 'पृथ्वीराज' आणि 'बच्चन पांडे' या चित्रपटांचा समावेश आहे.

Sooryavanshi release date postponed due to coronavirus: Will be ...

मात्र हे चारही चित्रपट कधी प्रदर्शित होणार यावर प्रश्नचिन्ह आहे. अक्षयचा 'सूर्यवंशी' चित्रपट 2020 सालाच्या बिग बजेट चित्रपटांपैकी एक मानला जातो. 135 कोटींच्या बजेटमध्ये बनविलेला हा चित्रपट 24 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता.

Akshay Kumar's 'Bachchan Pandey' loosely inspired from Ajith ...

मात्र कोरोना विषाणूमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 300 ते 400 कोटींची कमाई करेल असा अंदाज बांधला जात होता. 'सूर्यवंशी' चित्रपटानंतर त्याचा 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट फार चर्चेत होता.

Laxmmi Bomb - Wikipedia

हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. आणि सलमान खानचा चित्रपट 'राधे या चित्रपटाला टक्कर देण्याच्या तयारीत होता. मात्र कोरोनामुळे चित्रपटसृष्टी बंद असल्याने या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन्सचे काम अडकले आहे. हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार असल्याची चर्चा देखील आहे. जरी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला गेला तरीही एवढी कमाई नाही करू शकणार जेवढा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर करील असा अंदाज बांधला जात होता.

याचबरोबर अक्षय आणि 2017 चा विश्वसुंदरीचा किताब पटकावलेली मानुषी छिल्लरची मुख्य भूमिका असलेला 'पृथ्वीराज' चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोना विषाणूमुळे चित्रपटाचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबवण्यात आले. जरी जुलै महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले गेले तरीही चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणे अशक्य आहे. कारण चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन्सच्या कामालादेखील वेळ जाणार आहे.

याशिवाय अक्षयचा चौथा चित्रपट 'बच्चन पांडे'. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो चर्चेत होता.चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षी मे महिन्यापासून सुरू करण्यात येणार होते.मात्र ते ही रखडले. हा चित्रपट 25 डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. मात्र आमिर खानच्या 'लाल सिंह चढ्ढा' चित्रपटासोबतची टक्कर टाळण्यासाठी त्याने चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख बदलून आणि ती 22 जानेवारी 2021 करण्यात आली. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा चित्रपट देखील वेळेवर प्रदर्शित होऊ शकणार नसल्याचा अंदाज बांधला जात आहे.

यावर्षी अक्षय कुमार त्याच्या चार बिग बजेट चित्रपटांपैकी 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चिन्ह आहेत. अर्थातच कोरोना विषाणूने बॉलिवूड खिलाडीच्या पदरी निराशा आली आहे. 

akshay kumar four films get postponed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar four films get postponed