अक्षय कुमारने दिली हिंट, कियारा अडवाणी करणार 'या' अभिनेत्यासोबत लग्न?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 5 November 2020

अक्षय कुमारचा खोडसाळ स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे या शो दरम्यान अक्षय बोलता बोलता असं काही म्हणाला ज्यानंतर कियारा अडवाणीच्या बॉयफ्रेंडबद्दल अनेक अफवा पसरायला लागल्या.

मुंबई- अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'लक्ष्मी' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने कियारा गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर ट्रेंड आहे. मात्र यावेळी ती चर्चेत आली आहे तिच्या लव लाईफ आणि लग्नामुळे.  

हे ही वाचा: विद्या बालनच्या सिनेमातून विजय राज यांना डच्चू, नवीन अभिनेत्याच्या शोधात निर्माते मात्र बजेटचे तीनतेरा  

'लक्ष्मी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी कपिल शर्माच्या कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये गेले होते. तिथे दोघांनी कपिल शर्मा आणि त्याच्या टीममधील कलाकारांसोबत खूप धमाल केली. अक्षय कुमारचा खोडसाळ स्वभाव सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे या शो दरम्यान अक्षय बोलता बोलता असं काही म्हणाला ज्यानंतर कियारा आडवाणीच्या बॉयफ्रेंडबद्दल अनेक अफवा पसरायला लागल्या.  विशेष म्हणजे कियारा आडवाणीचं नाव एका बॉलीवूड अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे.
अक्षयने कपिल शर्मा शोमध्ये म्हटलं की 'ये सिद्धांतो वाली लडकी है' इतकंच नाही तर यानंतर पुन्हा एकदा तो म्हणाला की 'आप आपने सिद्धांतो पर रहे.' अक्षयच्या या गुगलीनंतर सगळ्यांमध्ये हशा पिकला. त्यामुळे कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

Kiara Advani Twins In White With Rumoured Beau Sidharth Malhotra, Leaves  Her Birthday Party With Him

अक्षय कुमारने 'कपिल शर्मा शो'मध्ये गमतीत म्हटलं की 'कियारा आडवाणी एक लडकी है जो इतने सारे सिद्धांतो मे विश्वास करती है' तेव्हापासून या दोघांच्या नावाची चर्चा सुरु झाली. सिद्धार्थ आणि कियारा पहिल्यांदा 'शेरशाह' सिनेमात एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. आत्तापर्यंत कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लव्ह लाईफच्या या केवळ अफवा आहेत. असं देखील म्हटलं जात आहे की त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनची ही एक ट्रीक आहे.   

akshay kumar gave hints actress kiara advani is going to marry this actor  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar gave hints actress kiara advani is going to marry this actor