अक्षयने 18 वर्षांनंतर मिळालेला अवॉर्ड दिला आमिरला कारण...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

काही वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने म्हणजेच अक्षयने स्वत: ला मिळालेला अवॉर्ड दिला होता. जाणून घ्या कोणाला दिला हा अवॉर्ड आणि काय होतं त्यामागचं कारण ! 

मुंबई : बॉलिवूड कलाकार वर्षानोवर्षे काम करत असतात. त्यांच्या उत्तम अभिनयाचं कौतुक हे प्रेक्षक मंडळी करतात. पण, त्यापलीकडेही उत्तम अभिनयाची पावती कलाकारांना पुरस्कारातर्फेही मिळते. दरवर्षी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीचे पुरस्कार जाहिर होतात. शिवाय अनेक वाहिन्यांचेही अवॉर्ड कलाकारांना मिळतात. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने म्हणजेच अक्षयने स्वत: ला मिळालेला अवॉर्ड दिला होता. जाणून घ्या कोणाला दिला हा अवॉर्ड आणि काय होतं त्यामागचं कारण ! 

हृतिकचं खरं नाव काय आहे ? कोणाचा होता तो दिवाना ? घ्या जाणून !

Image may contain: 4 people, people standing

दुसरं तिसरं कोणी नाही तर, बी-टाऊनचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अक्षयने तो अवॉर्ड दिला होता. अक्षय कुमारचा ‘सिंग इज किंग' हा चित्रपट 2008 मध्ये रिलिज झाला. या चित्रपटातील अक्षय आणि कॅटरीनाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. मुख्य भूमिकेत अक्षय आणि कॅटरीना होते आणि सिनेमातील गाणीही सुपरहिट ठरली. या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाला लोकांनी खूप पसंत केले.

2009 मध्ये या ‘सिंग इज किंग' या सिनेमासाठी अक्षयला  स्टार स्क्रीन अवॉर्ड्सचा बेस्ट ऍक्टर (पॉप्युलर चॉईस) अवॉर्ड मिळाला. अक्षयचा हा ड्रिम पुरस्कार होता. असं होतं तरीही त्याने हा अवॉर्ड घेण्यास नकार दिला. 
नकार देताना अक्षय म्हणाला, '' या पुरस्काराचा मी गेले 18 वर्षे वाट पाहत होतो. चांदणी चौकातून आलेल्या एका मुलाला इतकं मिळेल याचा स्वप्नातही कोणी विचार करणार नाही. आता माझ्या एका हातात माझं स्वप्न आहे आणि दुसऱ्या हातामध्ये वडिलांचे प्रेम. पण, तुम्हाला सर्वांना मला एक गोष्ट सांगायची आहे. काही दिवसांपूर्वीच मी आमिरचा 'गजनी' हा सिनेमा पाहिला. मी माझा 'सिंग इज किंग' हा चित्रपटाही पाहिला आणि त्यानंतर दोन्ही सिनेमांची तुलना केली. तेव्हा मला एक गोष्ट समजली की यावर्षीचा बेस्ट अॅक्टर मी नाही तर आमिर आहे. गजनी हा सिनेमा आणि त्यातील आमिरचा अभिनय हा कमाल आहे. त्यामुळे आमिरचा या पुरस्कारावरचा अधिकार आणि सन्मान मी हिरावून घेऊ शकत नाही.'' 'बॉलिवूड' या पेजने फेसबुकवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Image may contain: 2 people, people smiling

पुढे अक्षय म्हणाला, ''मला नाही माहित हा क्षण पुन्हा माझ्या आयुष्यात येईल की नाही. हे अवॉर्ड माझं नाही आणि त्यामुळे मी ते स्विकारु शकत नाही. वोट करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते, माझा तुम्हाला दुखावण्याचा हेतू नाही. पण, आमिर मित्रा हा अवॉर्ड तुझ्यासाठी आहे.''

नेहा कक्कर होणार 'या' प्रसिद्ध गायकाची सून; लग्नाची तारीख ठरली?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला जात नाही. त्यामुळे याही कार्यक्रमाला तो उपस्थित नव्हता. आमिरचा गजनी चित्रपट सुपरहिट ठरला होता. अभिनेत्री आसिन यामध्ये मुख्य भूमिकेत होती आणि या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कामे केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akshay kumar gave his award to aamir khan