'या' अभिनेत्रीमुळेच अक्षय-रविनाचे लग्न हाेता हाेता राहिले...

RAVINA-T.jpg
RAVINA-T.jpg

मुंबई : नुकताच बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. अक्षय एक फॅमिली मॅन असला तरीही चित्रपटसृष्टीत एक वेळ अशी आली होती ज्यावेळी त्याचं नाव विविध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. अभिनेत्री रवीना टंडन सोबत अक्षय कुमारच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत्या. मोहरा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि रवीना यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यांच्यातील प्रेमाची चर्चा बाॅलिवूडमध्येही पसरल्याचं पाहायला मिळालं होतं. 

दरम्यान, १९९९ मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने त्यांच्या रिलेशनशिपविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी लग्न करण्याचा विश्वास अक्षयने तिला देऊ केला होता. 

अक्षय कुमार आणि रवीना यांचं अफेअर सर्वज्ञात झाल्यानंतर हे दोघंही विवाहबंधनात अडकणार असं अनेकांनाच वाटत होतं. पण, बॉलिवूडच्या या जोडीमध्ये एकाएकी दुरावा आला. ‘खिलाडीयों का खिलाडी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षयचं नाव अभिनेत्री रेखासोबत जोडलं गेलं. या चित्रपटातील एका गाण्यावरुन रवीनासोबत अक्षयचं भांडणही झालं होतं. याच गाण्यात अक्षयसोबत रेखा यांची काही रोमॅण्टीक दृश्य चित्रीत करण्यात येणार होती.

दरम्यान एका मुलाखतीत स्पष्ट केल्यानुसार रवीनाने अक्षय-रेखा आणि सुश्मिता सेन यांना एकत्र पाहिलं होतं. मुख्य म्हणजे रवीनाने काही कार्यक्रमांमध्ये सुद्धा तिच्या आणि अक्षयच्या नात्याविषयी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं होतं. अक्षयसोबतच्या नात्याविषयी एका मुलाखतीत रवीना म्हणाली होती, ‘वारंवार विविध अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेल्यामुळे मला माझ्या एका पत्रकार मित्राने सजग राहण्याचा इशारा दिला होता. पण, प्रत्येकवेळी मी त्याला माफ करेन अशीच त्याची अपेक्षा असायची. जवळपास तीन वर्ष हे असंच सुरु होतं.’ नंतरच्या काळात अक्षय कुमारचं शिल्पा शेट्टीशीही नाव जोडलं गेलं होतं.

रेखा आणि अक्षयच्या नावाच्या वाढत्या चर्चा पाहता रवीनासोबतच्या त्याच्या नात्याला तडा गेला. इथे प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत रेखा-अक्षयने याविषयी बोलण्यास स्पष्ट नकारही दिला होता. या बहुचर्चित प्रेमप्रकरणामध्ये रवीनाने तिच्या आणि अक्षयच्या नात्यात आलेल्या दुाव्यासाठी रेखा यांनाच दोष दिला होता. रवीनाने नंतर अनिल थंडानीशी लग्न केलं तर अक्षय ट्विंकल खन्नाशी विवाहबद्ध झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com