धनुष-सारासोबत झळकण्यासाठी अक्षय कुमारच्या मानधनात दुपटीने वाढ

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 16 October 2020

या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार, दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री सारा अली खान अशी स्टारकास्ट झळकणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून आणि फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई : आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमाची बॉलीवूडमध्ये चांगलीच चर्चा आहे. 'अतरंगी रे' असं त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव असून प्रेक्षकांनाही या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार, दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि अभिनेत्री सारा अली खान अशी स्टारकास्ट झळकणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून आणि फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता अभिनेता अक्षय कुमारच्या मानधनाचा आकडा अनेकांना थक्क करतोय.

हे ही वाचा: प्रसिद्ध गायक कुमार सानु यांना कोरोनाची लागण    

आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' या सिनेमात धनुष आणि सारा अली खान हे मुख्य भूमिकेत आहेत तर खिलाडी कुमारच्या भूमिकेवरुन मात्र अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. असं असलं तरीही या सिनेमात तो कॅमिओ साकारताना दिसणार असल्याची माहिती समोर येतेय. या कॅमिओसाठी त्याला तब्बल 27 कोटी रुपये इतकं इतकं घसघशीत मानधन देण्यात आल्याचं म्हटलं जतंय.

सुत्रांच्या माहितीनुसार ९ हा अक्षय कुमारचा भाग्यांक अर्थात लकी नंबर आहे. त्यामुळं बेरीज करुन हा आकडाच (2+7=9) त्यानं इथंही मानधनाच्या स्वरुपात घेतला असल्याचं पाहायला मिळतंय. हा प्रत्येकाच्या समजुतींचा भाग असला तरीही खिलाडी कुमार मात्र अनेकदा ९ याच आकड्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर तो शूटींग दरम्यान एका दिवसाचे एक कोटी रुपये आकारतो असंही म्हटलं जातंय.. पण 'अतरंगी रे'साठी मात्र त्यानं जवळपास दुपटीनं मानधन आकारल्याची चर्चा आहे.

akshay kumar has charged a huge fee for atrangi re opposite dhanush and sara  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar has charged a huge fee for atrangi re opposite dhanush and sara