'केसरी'च्या चित्रीकरणादरम्यान झाली अक्षयला दुखापत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

सातारा : 'केसरी' या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात असलेला अभिनेता अक्षय कुमार याला दुखापत झाली आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान साहसदृष्य करताना ही दुखापत झाल्याचे समजते. या दुखापतीत त्याच्या बरगडी आणि छातीला मार लागल्याचे समजते. केसरी या सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग सिंग हे आहेत. हे शूटिंग येत्या गुरूवारी संपणार होतं, पण अक्षयच्या या दुखापतीमुळे आता सूटिंग काही दिवस पुढे ढकलण्यात आले आहे.   

वाठार या साताऱ्यातील एका भागात केसरीच्या साहसदृष्यांचे शूटिंग चालू होते. तेव्हाच एका सीनदरम्यान अक्षय छातीवर पडला. त्यामुळे त्याच्या छाती व बरगडी दुखावली गेली आहे. या अपघातानंतर तातडीने अक्षयवर प्रथमोपचार केले गेले. त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, तसेच सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. 

अक्षयला मुंबईला नेण्यासाठी विमानाची सोय देखील करण्यात आली. पण, अक्षयने मुंबईला जाण्यास नकार दिला. शूटिंग पूर्ण करून मगच मुंबईला जाण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तो या शूटिंगसाठी कोरेगाव तालुक्यात राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी त्याची सेटवर जाऊन भेट घेतली होती. 

akshay kumar

1897 मधल्या सारागढीच्या युध्दात सहभागी असलेल्या शीख रेजिमेंटच्या सैनिकांची साहसकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 22 मार्च 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.aks

Web Title: akshay kumar injured while kesari movie shooting