स्वातंत्र्यदिनी 'या' तीन सिनेमांची धडक!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

येत्या 15 ऑगस्टला अक्षयकुमार, जॉन अब्राहम आणि देओल ब्रदर्स यांचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

सिनेसृष्टीतील तीन बड्या अभिनेत्यांचे सिनेमे नेमके एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. कोणताही बिग बजेट वा बिग बॅनर सिनेमा रिलीज झाला की तो 100 कोटींच्या घरात प्रवेश करावा याचीच ईच्छा त्या सिनेमाची टीम बाळगून असते. गेल्या काही वर्षापासून कवळ 100 कोटीच नव्हे तर त्याच्या दुप्पटही गल्ला कमावताना सिनेमे दिसत आहेत. पण येत्या काळात एकाच दिवशी तीन सिनेमे प्रदर्शित होणार असल्याने या सिनेमांमध्ये निदान 100 कोटींचा गल्ला कमावता यावा यासाठी धडक होणार आहे हे नक्की. 

येत्या 15 ऑगस्टला अक्षयकुमार, जॉन अब्राहम आणि देओल ब्रदर्स यांचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. रीमा कागती दिग्दर्शित 'गोल्ड' या सिनेमात अक्षयकुमारची प्रमुख भुमिका आहे. ज्यातून टीव्हीची नागिण मौनी रॉयने आपला बॉलिवूड डेब्यू केला आहे. सिनेमा देशभक्तीवर आधारित आहे. सोशल मिडयावर सध्या 'गोल्ड'ची जोरदार चर्चा सुरु आहे. 

gold

'सत्यमेव जयते' हा जॉन अब्राहम स्टारर सिनेमाही 15 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. जॉन आता जास्त सिनेमात दिसत नसला तरी त्याचे अलिकडील निवडक सिनेमेही फारसे गाजले नाहीत. जॉन आणि अक्षय हे चांगले मित्र आहेत. तेव्हा या दोन मित्रांचे सिनेमे 15 ऑगस्टला टक्कर घेताना त्यांची भूमिका जाणून घेणेही महत्त्वाची ठरेल. 

satyamev jayate

तसेच, या स्वातंत्र्यदिनी देओल ब्रदर्सचा 'यमला पगला दिवाना फिर से' हा कॉमेडी सिनेमा प्रदर्शित होईल. या तीनही सिनेमांचे विषय वेगळे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना हे तीनही सिनेमे आवडतील की यापैकी एखादाच हिट ठरेल हे तर काळच ठरवेल. 

yamla pagla diwana fir se

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Akshay Kumar John Abraham And Bobby Deol Film Clash On Same Date