दारासिंग त्यांच्या व्यक्तीचरित्राचे प्रकाशन 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई - रुस्तम-ए-हिंद अशी ओळख असणाऱ्या दारासिंग त्यांच्या व्यक्तीचरित्राचे प्रकाशन अभिनेता नुकतेच अक्षय कुमारच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या मुलगा, अभिनेता विंदू दारासिंग उपस्थित होता. 'दिदारा अका दारासिंग' असे या व्यक्तीचरित्राचे नाव आहे.

छोट्या पडद्यावरील रामायण मालिकेतील हनुमानाच्या भूमिकेने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. याविषयी आणि कुस्तीगीरीपासून ते चित्रपटापर्यंतचा प्रवास या पुस्तकात आहे. 

दारासिंग यांचा जन्म जाट कुटुंबात झाला. त्यांचे बालपण पंजाबातील अमृतसरजवळील धर्मू चाक नावाच्या खेड्यात गेले. नशीब अजमावायला म्हणून ते सिंगापूरला गेले. तेथेच योगायोगाने कुस्तीच्या आखाड्याकडे त्यांचे पाय वळाले. त्यांच्या पहिल्या जाहीर कुस्तीत दारासिंग यांनी एका चिनी पहिलवानाला चितपट केले. या कुस्तीने दारासिंग यांना प्रसिद्धी आणि पैसे मिळाले आणि त्यांच्या कुस्तीच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. त्यांचा हा रंजक प्रवास या चरित्रात वर्णन केला आहे. 

Web Title: Akshay Kumar launches Dara Singh's biography Deedara