Akshay Kumar OMG 2: लांब जटा, अंगभर भस्म आणि हातात डमरू.. अक्षय कुमारनं केली नव्या चित्रपटाची घोषणा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar looks as Shiva with dreadlocks, announces release date of OMG 2

Akshay Kumar OMG 2: लांब जटा, अंगभर भस्म आणि हातात डमरू.. अक्षय कुमारनं केली नव्या चित्रपटाची घोषणा..

OMG 2 release date announce : बॉलीवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. त्याने एक पोस्टर शेयर करत त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

अक्षयचे गेल्या वर्षभरात अनेक चित्रपट फ्लॉप गेले, पण ऐकेल तो अक्षय कसला. त्याने लगेचच एका नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

ज्या चित्रपटाने प्रेक्षकांना हसवून सोडलं, भक्ति आणि अंधश्रद्धा यांच्यातील फरक दाखवला, जो तूफान हिट झाला असा 'OMG' हा चित्रपट सर्वांनाच ठाऊक असेल. या या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच दूसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच अक्षयने 'OMG 2' ची घोषणा केली.

'OMG 2' (o may god 2) 'ओएमजी 2' या चित्रपटाची रिलीज दडेट जाहीर केली आहे.

(Akshay Kumar looks as Shiva with dreadlocks, announces release date of OMG 2)

नुकतेच अक्षयने एक पोस्टर शेयर केले आहे. यावेळी अक्षय कुमारने शेयर केलेल्या पोस्टवरवर त्यांचा साक्षात शिवरूपी लुक दिसत आहे. लांब जटा, अंगभर भस्म आणि हातात डमरू असा अक्षयचा दमदार लुक समोर आला आहे.

सोबतच अक्षयने चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. 'OMG 2' (O MY GOD 2 ) असे या चित्रपटाचे नाव असून येत्या 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार सोबत परेश रावल, मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिनयानेही लक्ष वेधले होते. तर दुसऱ्या भागातही अशीच दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

य चित्रपटात अक्षय कुमार सोबत अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता पंकज त्रिपाठी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोबतच अनेक कलाकार आणि भन्नाट विषय पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता चांगलीच शिगेला गेली आहे.