"नमस्ते इंग्लंड'मध्ये परिणिती 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

बॉलीवूडमधील काही जोड्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीसाठी लोकप्रिय आहेत. त्यातील एक नाव म्हणजे ऍक्‍शन हिरो अक्षयकुमार आणि बार्बी गर्ल कतरिना कैफ. दोघांनी पहिल्यांदा "हम को दीवाना कर गए' चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

त्यातील त्यांची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली होती. त्यानंतर ते "नमस्ते लंडन'मध्ये झळकले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता त्याचा "नमस्ते इंग्लंड' सिक्वेल बनणार आहे. त्यात सुरुवातीला अक्षय-कतरिनाच होते; मात्र सूत्रांच्या माहितीनुसार कतरिनासोबत काम करण्यास अक्षयने नकार दिला आहे. त्यामुळे आता कतरिनाच्या जागी अभिनेत्री परिणिती चोप्राची वर्णी लागली आहे.

अक्षय परिणितीबद्दल भरभरून बोलतो. तो म्हणाला, "परिणिती खूप चांगली अभिनेत्री आहे. आतापर्यंत मी तिच्यासोबत कधीच काम केलेलं नाही.' अक्षयने कतरिनासोबत काम करण्यास नकार दिल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. रुपेरी पडद्यावर अक्षय व परिणितीची केमिस्ट्री कितपत यशस्वी होते, हे पाहणं औत्सुक्‍याचं ठरेल

Web Title: Akshay Kumar rejects Katrina Kaif for Parineeti Chopra