YouTuber वर अक्षयने केला 500 कोटींचा मानहानीचा दावा

Akshay Kumar Rs 500 Crore Defamation Suit on YouTuber.jpg
Akshay Kumar Rs 500 Crore Defamation Suit on YouTuber.jpg

मुंबई - बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आता यु ट्युबच्या विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे. त्याने त्या विरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. अक्षयने सुशांत सिंग राजपूत केस संदर्भात रिहाला कॅनडात पोहचविण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. यामुळे अक्षय चर्चेत आला आहे. त्याच्यावर नेटक-यांनी टीका केली आहे.

दुसरीकडे अशाप्रकारचा आरोप करणा-याविरोधात अक्षय आक्रमक झाला आहे. अशाप्रकारच्या फेक न्युज स्प्रेडकेल्याप्रकरणी संबंधिताला 15 लाख रुपये मिळाले आहेत. प्रसिध्दी आणि अफवा पसविल्याप्रकरणी याप्रकरणात अक्षय कुमारचे नाव घेण्यात आले आहे.

सुशांतसिंग रजपूतच्या केसशी संबंधित असणा-या रेहाला अक्षयने कॅनडामध्ये पळुन जाण्यासाठी मदत केली होती. याप्रकारचा गंभीर आरोप अक्षयवर करण्यात आला आहे. त्यावर अक्षयने युट्युबला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.अक्षयने आपले नाव सुशांतच्या केसमध्ये घेतल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे संतापलेल्या अक्षयने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आता अक्षयने युट्युबर राशीद सिध्दिकीच्या विरोधात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर खोट्या बातम्या पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांचेही नाव सुशांत सिंग केसप्रकरणात घेतले होते.

एका इंग्रजी वृत्तपत्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सिध्दिकीने यु ट्युबवर एक व्हिडीओ अपलोड करुन त्यात रिहाला कॅनडापर्यत पोहचविण्यात अक्षयची भूमिका मोठी होती. असे म्हटले होते. तसेच सिध्दिकीने उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाही त्या घटनेशी संबंध असल्याचे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली होती.

सिध्दीकीला चार महिन्यामध्ये 15 लाख रुपये मिळाले असून त्याच्या बातम्यांमध्ये वापरण्यात आलेला बराचसा भाग हा सुशांतच्या केससंदर्भातील आहे. सिध्दिकी हा 25 वर्षांचा असून तो सिव्हिल इंजिनिअर आहे.बिहारमधल्या या तरुणाने FF News नावाचे चॅनेल सुरु केले होते.  शिवसेना लिगल सेलचे अॅड. धर्मेंद्र मिश्रा यांनी त्याच्याविरोधात केस दाखल केली होती. सिध्दिकीला मे महिन्यात 296 रुपये मिळाले तर मे आणि सप्टेंबरमध्ये 6 लाख 50 हजार 898 रुपये मिळाले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com