आँख मारे वो...पण लडकी नव्हे तर बॅग! अक्षयचा व्हिडिओ व्हायरल Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar

Akshay Kumar: आँख मारे वो...पण लडकी नव्हे तर बॅग! अक्षयचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा किंग आहे. गेले काही दिवस अक्षयसाठी काही खास राहिलेलं नाही. त्याचे बच्चन पांडे असो किंवा रक्षाबंधन नाहितर आत्ताच रिलिज झालेला सेल्फी. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. अक्षय कुमार हा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता.

आता अभिनेता देवभूमीमध्ये शूटिंग करत होता, त्यामुळे त्याने येथे टाहून केदारनाथ धाम आणि बद्रीनाथ धाम येथे जाऊन देवाचे आशीर्वाद घेतले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते, परंतु आता अक्षय कुमार त्याच्या अनोख्या बॅगमुळे चर्चेत आला आहे.

उत्तराखंडमधील शूटिंग शेड्यूल पूर्ण करून अक्षय हा मुंबईला परतला. तोकलिना विमानतळावर दिसला, परंतु सर्वाच लक्ष अक्षयपेक्षा जास्त त्याने घेतलेल्या बॅगने वेधुन घेतले.

अक्षय कुमार एका अनोख्या बॅगसोबत दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची सतत चर्चा होवु लगाली. एवढेच नाही तर काल रात्री तो याच बॅगसह मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता, त्यानंतर त्याच्या बॅगची चर्चा सुरु झाली.

अक्षयची ही बॅग काळ्या रंगाची आहे. ज्यामध्ये एलईडी डिस्प्ले देखील आहे. चेहऱ्याच्या आकाराच्या या बॅगेला डोळे देखील आहेत. जे बंद चालू होत आहेत. ते डोळे सात्तत्याने बंद चालू होत असल्याने सर्वाचे लक्ष वेधुन घेतले आणि त्यांची बॅग डोळे मारत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

आता सोशल मिडियावर व्हायरल झालेली या बॅगची किंमत किती आहे असा प्रश्नही नेटकऱ्याना पडला. त्याची सुरुवात 9000 पासून होते जी वाढतच जाते. पण वृत्तांनुसार अक्षय कुमारच्या या बॅगची किंमत 30 ते 35 हजार आहे.

अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो या वर्षी, तो OMG 2 आणि Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

त्याच्याकडे टायगर श्रॉफसोबतचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपटही आहे जो 2024 मध्ये रिलीज होणार आहे. त्याचबरोबर तो 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागातही दिसणार आहे.

टॅग्स :viralVideoakshay kumar