अक्षय कुमारने मानले आभार

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

सेल्फ डिफेन्स ही कला भारतामध्ये आता लोकप्रिय होतेय. असे दुसरे तिसरे कोणी नाही खुद्द अक्षय कुमार म्हणतोय. ज्याची ऍक्‍शन पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. तो जसा खिलाडी आहे तसाच तो उत्तम ऍक्‍शनपटू आहे. त्याला तॉयक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळालाय हे सगळ्यांना माहीत आहेच. अक्षय कुमार एखाद्या फिल्मच्या निमित्ताने किंवा एखाद्या जाहिरातीच्या निमित्ताने किंवा अगदी एखाद्या ठिकाणी खास पाहुणा कलाकार म्हणून जरी गेला तरी तो सेल्फ डिफेन्स, मार्शल आर्ट, फिटनेस याविषयी भरभरून बोलतोच; शिवाय टिप्सही देतोच. म्हणूनच तो अलीकडे असे म्हणाला मार्शल आर्ट आणि सेल्फ डिफेन्स ही भारतामध्ये लोकप्रिय होतेय.

सेल्फ डिफेन्स ही कला भारतामध्ये आता लोकप्रिय होतेय. असे दुसरे तिसरे कोणी नाही खुद्द अक्षय कुमार म्हणतोय. ज्याची ऍक्‍शन पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. तो जसा खिलाडी आहे तसाच तो उत्तम ऍक्‍शनपटू आहे. त्याला तॉयक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळालाय हे सगळ्यांना माहीत आहेच. अक्षय कुमार एखाद्या फिल्मच्या निमित्ताने किंवा एखाद्या जाहिरातीच्या निमित्ताने किंवा अगदी एखाद्या ठिकाणी खास पाहुणा कलाकार म्हणून जरी गेला तरी तो सेल्फ डिफेन्स, मार्शल आर्ट, फिटनेस याविषयी भरभरून बोलतोच; शिवाय टिप्सही देतोच. म्हणूनच तो अलीकडे असे म्हणाला मार्शल आर्ट आणि सेल्फ डिफेन्स ही भारतामध्ये लोकप्रिय होतेय. कारण तरुणाई याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतेय. कारण तरुणांना या कलेचे महत्त्व हळूहळू पटू लागलेय. त्यामुळे ते याचे प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत. तरुणांचा अशाप्रकारे ओघ बघून अक्षय कुमारने खासकरून पालकांचे आभार मानले आहेत. कारण पालकांनी त्यांच्या मुलांना या कला शिकण्याची संधी दिली आणि हे सर्व तो कुडो वर्ल्ड कपच्या कार्यक्रमात म्हणाला. या वर्ल्ड कपमध्ये 25 देशांनी सहभाग नोंदवलाय. हेही अक्षर कुमारला अतिशय अभिमानास्पद वाटले. त्याने महिलांसाठी खास मार्शल आर्टचे क्‍लासेस अंधेरी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍समध्ये सुरू केले आहेत. हेही सर्वांना माहीत आहेच. त्यामुळे या कलेविषयी कधीही, कुठेही अगदी हक्काने बोलण्याची एकही संधी तो सोडत नाही. जॉनी एलएलबीच्या दमदार ओपनिंगनंतर आता तो तापसी पन्नू हिच्यासोबत "नाम शबाना' या चित्रपटात दिसणार आहे. या आधी दोघांनी बेबी चित्रपटात एकत्र काम केले होते.  
 

Web Title: akshay kumar thanks to parents