Akshaya Deodhar Birthday: आधी सासू प्रेमात पडली आणि मग नवरा.. अक्षयाची भलतीच आहे लव्हस्टोरी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshaya Deodhar Birthday story her lovestory with hardeek joshi

Akshaya Deodhar Birthday: आधी सासू प्रेमात पडली आणि मग नवरा.. अक्षयाची भलतीच आहे लव्हस्टोरी..

Akshaya Deodhar Birthday : मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी. गेल्याच वर्षी त्यांनी लग्नगाठ बांधली.

पण ते दोघे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. रोज काहीतरी आठवणी, फोटो, व्हिडिओ शेयर करत असतात. अक्षया आणि हार्दिक आजही प्रेक्षकांच्या मनातील राणादा आणि पाठकबाईच आहेत. त्यांच्या 'तुझ्यात जीव' रंगला या मालिकेची भुरळ अजूनही प्रेक्षकणाच्या मनावर कायम आहे.

आज अभिनेत्री अक्षया देवधरचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिची खास लव्हस्टोरी.. असं कोणता क्षण होता, जेव्हा हार्दिकने अक्षयाला 'तुझ्यात जीव रंगला..' म्हणत प्रेमाची कबुली दिली. जाणून घेऊया ही खास बात..

(Akshaya Deodhar Birthday story her lovestory with hardeek joshi)

हार्दिक आणि अक्षया यांनी गेल्यावर्षीच पुण्यामध्ये अत्यंत पारंपरिक सोहळा करत लग्नगाठ बांधली. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत ते दोघे प्रमुख भूमिकेत होते. नंतर मालिकेत काम करता करता दोघांचेही सूर जुळले आणि ते एकत्र आले.

पण ही लव्हस्टोरी अशी सहज घडली नाही. हार्दिकचे अक्षयावर प्रेम असूनही त्याने कधी व्यक्त केलं नाही. त्यासाठी हार्दिकच्या आईला पुढाकार घ्यावा लागला. हार्दिकच्या आईला अक्षया प्रचंड आवडत होती म्हणून त्यांनीच पुढाकार घेऊन त्या दोघांची लग्नगाठ बांधली.

याचाच किस्सा एका मुलाखतीत हार्दिकने सांगितला होता, तो म्हणाला होता की, ''मालिकेच्या निमित्ताने आम्ही पाच वर्ष एकत्र असल्याने आम्ही खूप चांगले मित्र होतो. त्यामुळे ते कुटुंबच होतं आमचं. पण माझ्या डोक्यात तिच्याविषयी असा कधीच विचार आला नव्हता.''

''पण माझ्या आईला ती खूप आवडली होती. माझ्या आईने तिला माझ्या अपरोक्ष अनेकदा माझ्याविषयी विचारलं आहे, जे मला नंतर समजलं. एकदा मला आई म्हणाली की, आता मालिका संपलेय, मग तू दुसरी कोणती तरी मालिका घेशील, चित्रपट करशील, त्यामुळे आता घरात आहेस तर लग्नाचा विचार आधी कर. तुझं वय निघत चाललं आहे. तु एकदा अक्षयाशी बोलून बघ.. पण मी तेव्हाही हा विचार केला नाही.'

'' मी आईला म्हटलं की ती तसं केलं तर आता जेवढं ती माझ्याशी बोलत आहे ना तेही ती बंद करेल. तरीही आईने हट्ट सोडला नाही. आई म्हणाली, आयुष्यात सर्व गोष्टी आईसाठी करतो, ही एवढी एक गोष्ट कर आणि तिला विचा. मग मी ठरवलं की एकदा बोलून बघूया. तेव्हा मी अक्षयाशी बोललो की माझ्या आईची इच्छा आहे आपल्या दोघांचं लग्न व्हावं. तेव्हा अक्षयानेही होकार दिला आणि म्हणाली माझी काहीच हरकत नाहीय, फक्त तू एकदा घरी येऊन बोल. पुढे मी तिच्या घरी गेलो, आणि मग आमचं जुळलं.. '' अशी पडद्यामागची स्टोरी अक्षयाने सांगितली होती.