
ज्येष्ठ रंगकर्मी विद्याताई पटवर्धन यांना दुर्धर आजार, आर्थिक मदतीसाठी 'अलबत्या गलबत्या'चा विशेष प्रयोग..
vidya patwardhan medical help: मराठी रंगभूमीवरील एक दिग्गज नाव म्हणजे विद्याताई पटवर्धन. आज मराठी मनोरंजन विश्वाला लाभलेले कित्येक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री त्यांनी घडवले आहेत. बालरंगभूमीवर विशेष योगदान देणाऱया बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या विद्या पटवर्धन म्हणूनही ओळखल्या जातात. बालमोहन शाळेपासून ते नाट्य चळवळी पर्यंत त्यांनी आपले आयुष्य आयुष्य बालरंगभूमीसाठी वेचले.
अशा विद्याताई सध्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना गर्भाशयाचा कर्करोग झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. किमो थेरपी देण्यात आली. दरम्यान त्यांना आणखी काही आजार जडले आणि त्यांची प्रकृती अधिकच खालवत गेली. सध्या त्या बेडरीडन असून त्यांना चालणे -बोलणे शक्य नाही.
त्यांच्यावर दादरमध्ये उपचार सुरू असून त्यांचे विद्यार्थी अभिनेते नीलेश दिवेकर आणि इतर काही विद्यार्थी अभिनेते आणि अभिनेत्री मिळून त्यांची काळजी घेत आहेत. परंतु त्यांची औषधे, उपचार, राहण्याची व्यवस्था हा खरच प्रचंड मोठा आहे. आणि त्यासाठी आता आर्थिक मदतीची गरज आहे.
(albatya galbatya marathi drama play special show for veteran artist vidya patwardhan medical help )

albatya galbatya marathi drama play special show for veteran artist vidya patwardhan medical help
म्हणूनच त्यांच्या मदतीसाठी विद्याताईंच्या शिष्यांनी 'अद्वैत थिएटर'च्या मदतीने ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित केला आहे. हा प्रयोग 19 मार्च रोजी दुपारी 4 वाजता दादरच्या शिवाजी मंदिर येथे होईल. या प्रयोगातून मिळणारा निधी हा विद्याताईंना वैद्यकीय मदतीसाठी दिला जाणार आहे.
'आजवर रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद ह्या बालनाट्याला मिळाला. अशाच बालरंगभूमीवर विशेष योगदान देणाऱ्या बालमोहन विदयामंदिर शाळेच्या ' विद्याताई पटवर्धन '. ज्यांच्या माध्यमातून या मनोरंजन क्षेत्राला अनेक नामवंत कलाकार मिळाले. विद्याताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य बालनाट्यासाठी अर्पण केलं. आज त्या एकट्या एका दुर्धर आजाराशी लढत आहेत. आम्ही त्यांचे सर्व विद्यार्थी त्यांच्या सोबत निश्चितपणे उभे आहोतच. पण त्यांच्या उपचारांत एक आधार म्हणून आमच्या सोबत "अलबत्या गलबत्या" ची संपूर्ण टिम एकत्रितपणे ह्या माध्यमातून छोटी मदत करू इच्छिते.' असे अद्वैत थिएटरचे प्रमुख निर्माते राहुल भंडारे म्हणाले.
तरी या मदतीला हातभार लावण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. आपल्या विद्याताईंसाठी आपण जास्तीत जास्त तिकिटे घेऊन त्यांच्यासाठी एक चांगला निधी निश्चितच उभारू शकतो. असे आवाहन करण्यात आले आहे.