Ali Baba Set Fire: 'अलीबाबा..' मालिकेचा सेट जळून खाक.. इथेच अभिनेत्री तुनिषा शर्माने घेतला होता गळफास

'अलिबाबा: दास्तान-ए-काबुल'मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना..
Ali Baba: Dastan-E-Kabul Set Where Tunisha Sharma suicide Engulfed In Fire
Ali Baba: Dastan-E-Kabul Set Where Tunisha Sharma suicide Engulfed In Firesakal

पाच महिन्यांपूर्वी एका बातमीने सर्वांचीच झोप उडवली ती म्हणजे, अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या. 'अलिबाबा: दास्तान ए कबूल' या मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास लावून घेतला. त्यानंतर ही मालिका, त्यातले कलाकार, तुनिषाचे प्रेम प्रकरण अशा बऱ्याच चर्चा झाल्या.

आता पुन्हा एकदा 'अलिबाबा: दास्तान ए कबूल' ही मालिका चर्चेत आली आहे. कारण या मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना घडली आहे. ज्या सेटवर तुनिषाने २४ डिसेंबरला गळफास घेत आत्महत्या केली होती. तो सेट एका भीषण आगीत सेट जळून खाक झाला आहे. शनिवारी या सेटवर अचानक आग लागली, ज्यामध्ये संपूर्ण सेट जळून उद्ध्वस्त झाला आहे.

(Ali Baba Dastan-E-Kabul Set Where Tunisha Sharma Suicide Engulfed In Fire)

Ali Baba: Dastan-E-Kabul Set Where Tunisha Sharma suicide Engulfed In Fire
Maharashtrachi Hasya Jatra: पॉर्न बघणाऱ्यांनी 'हास्यजत्रे'वर टीका करू नये.. 'त्या' कमेंटवर भडकला अभिनेता..

‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ या मालिकेचा हा सेट पालघर जिल्ह्यातील भजनलाल स्टुडिओ येथे आहे. शुक्रवारी, 12 मे रोजी रात्री उशिरा या भजनलाल स्टुडिओला अचानक आग लागली. ही आग इतकी मोठी होती ती आटोक्यात आणण्यासाठी शनिवारी 13 मे च्या पहाटेपर्यंत प्रयत्न सुरू होते. ही आग 13 मेच्या सकाळी पूर्णतः विजवण्यात आल्याची माहिती वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

या सेटला आग कशी लागली, नेमके काय झाले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु यंग भीषण असल्याने सध्या याचा तपास सुरु आहे. या आगीमुळे संपूर्ण सेटचे नुकसान झाले असून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे भजनलाल स्टुडिओमधील याच सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्माने पाच महिन्यांपूर्वी स्वतःला संपवलं होतं. तिच्या मृत्यूनंतर तिचा प्रियकरआणि अलीबाबा मालिकेतील हीरो शिझान खानवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी शिझान खानला तुरुंगात देखील टाकण्यात आले होते. सध्या त्याला जामीन मिळाला असून तो ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com