esakal | 'डोंट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ..' शाहरुखवरुन BYJUsला सेलिब्रिटींचे टोमणे
sakal

बोलून बातमी शोधा

shah rukh khan

BYJUs शाहरुखच्या सर्व जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतला.

'डोंट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ..' शाहरुखवरुन BYJUsला सेलिब्रिटींचे टोमणे

sakal_logo
By
स्वाती वेमूल

क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी मुलगा आर्यन खानच्या Aryan Khan अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनेता शाहरुख खानच्या Shah Rukh Khan पाठिशी उभे राहिले. आता लर्निंग अॅप 'बायजू'ने BYJUs शाहरुखच्या सर्व जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर अली फजल, अंजना सुखानी आणि नकुल मेहता यांसारख्या सेलिब्रिटींनी ट्विट करत किंग खानची साथ दिली आहे. अंजना आणि अली फजलने ट्विट करत 'बायजू'ला टोला लगावला आहे.

'प्रिय ब्रँड्स, शाहरुखची लोकप्रियता आणि प्रसिद्धी ही कधीही न बदलणारी आहे. तो सध्या सामोरं जात असलेल्या समस्येपेक्षा किंग खान म्हणून त्याचं असलेलं मूल्य खूप अधिक आहे. जगभरातील त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाला कमी लेखू नका', असं ट्विट अंजनाने केलं आहे. तर पिंक फ्लोयडच्या प्रसिद्ध गाण्याचा संदर्भ देत अली फजलने 'बायजू'ला उपरोधिक टोमणा मारला. 'By‘e’ju… Another brick in the wall, हे गाणं सध्या माझ्या हेडफोन्समध्ये खूप मोठ्या आवाजात वाजत आहे. आम्हाला शिक्षणाची गरज नाही, असे गाण्याचे बोल आहेत', असं त्याने लिहिलं. अलीचं हे ट्विट रिचा चड्ढाने रिट्विट केलं आहे.

हेही वाचा: IPL 2021: कामगिरी CSKच्या ऋतुराजची, शुभेच्छा मात्र सायलीला

आर्यनच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर बायजूने त्यांच्या जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या जाहिरातींसाठी बायजूने शाहरुखसोबत अ‍ॅडव्हान्स बुकिंग केली होती. बायजू हा शाहरुखच्या सर्वांत मोठ्या स्पॉन्सरशिप डिल्सपैकी एक आहे. 'ईटी'च्या रिपोर्टनुसार, बायजूकडून त्यांच्या ब्रँड एडोर्समेंटसाठी दरवर्षी जवळपास तीन ते चार कोटी रुपये शाहरुखला देण्यात येतात. २०१७ पासून शाहरुख बायजूचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. गेल्या काही वर्षांत बायजू या स्टार्टअपने चांगलाच व्यवसाय केला. बायजूने शाहरुखला त्यांच्या जाहिरातींच्या करारामधून पूर्णपणे हटवलं आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

loading image
go to top