''३ इडियट्स'मधील भूमिकेमुळे मला नैराश्य आलं'; अली फजलचा खुलासा

अलीने 'जॉय लोबो' या इंजिनीअरिंग विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती.
Ali Fazal
Ali Fazal

बॉलिवूड अभिनेता अली फजलने Ali Fazal नेहमीच हटके भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं. मग ती भूमिका छोटी असो किंवा मोठी, अलीने नेहमीच चित्रपटात आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली. आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' 3 Idiots या चित्रपटात अलीने खूप छोटी भूमिका साकारली होती. 'जॉय लोबो' असं त्याच्या भूमिकेचं नाव होतं. जॉय हा इंजीनिअरिंगचा अत्यंत हुशार विद्यार्थी असतो, मात्र तो पदवी संपादन करू शकत नाही असं डॉक्टर विरू सहस्त्रबुद्धे सांगितल्यानंतर हताश होऊन तो आत्महत्या करतो. चित्रपटात जॉयची भूमिका साकारल्यानंतर नैराश्याला सामोरं गेल्याचा खुलासा अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. (Ali Fazal reveals he went into depression after playing Joy in 3 Idiots)

'थ्री इडियट्स या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली, तेव्हापासून मी नैराश्यात होतो. चित्रपटात मी खूप छोटी भूमिका साकारली होती. पण त्यावेळी खरंच काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वत:ला दुखापत करून घेतली होती. त्यानंतर मला काही वृत्तवाहिन्यांमधून फोन येत होते की सर तुम्ही विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे. त्यामुळे यावर तुमचं काय मत आहे? असे प्रश्न मला विचारले जात होते. पण त्या घटना माझ्यासाठी खूप धक्कादायक होत्या. तेव्हा मीसुद्धा कॉलेज विद्यार्थीच होतो. या सर्व घटनांमुळे मी नैराश्यात गेलो होतो', असं अलीने सांगितलं.

Ali Fazal
नीना गुप्ता यांच्या आत्मचरित्रातील ६ धक्कादायक खुलासे
Ali Fazal
'प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतो'; विराजस मालिका सोडणार?

'३ इडियट्स' या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होतं. यामध्ये आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन या तिघांच्या मुख्य भूमिका होत्या. त्याचसोबत करीना कपूर खान आणि बोमन इराणी यांनीसुद्धा महत्त्वपूर्ण साकारल्या होत्या. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई तर केलीच पण त्यासोबतच प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com