आलिया आणि रणबीर फ्रान्समध्ये करणार 'शुभ मंगल'!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

'आय दिवा' या साइटने दिलेल्या वृत्तानुसार हे क्युट कपल 2020 मध्ये नाही तर चक्क याच महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.

मुंबई : बॉलिवूडमध्ये लव-अफेअर चा सिलसिला अगदी सामान्य आहे. त्यामध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्या चाहत्यांच्या पसंतीमध्ये अगदी टॉपवर आहेत. रणबीर-आलिया या जोडीची फॅन फॉलोइंग सवाधिक आहे. या दोघांचे एकमेकांसोबतचे फोटो इंटरनेटवर धुमाकुळ घालतात. हे कपल जेव्हापासून डेट करत आहेत, चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या कपलचे क्रेझी फॅन्स इंटरनेटवर लग्नाचे फोटोशॉप केलेले फोटो तर, कधी त्यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल करतात. आता पुव्हा एकदा ते लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

Image may contain: 4 people, people standing

काही दिवसांपूर्वींच आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाची पत्रिका इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली. पण अखेर ती बातमी खोटी ठरली आणि चाहत्यांची नाराजी झाली. या कपलच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का आहे. 'आय दिवा' या साइटने दिलेल्या वृत्तानुसार हे क्युट कपल 2020 मध्ये नाही तर चक्क याच महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. याच महिन्यातील 8,9 आणि 10 नोव्हेंबरला फ्रान्समध्ये हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या बि-टाउनमध्ये आहे.

Image may contain: 6 people, people smiling, people standing, hat and indoor

रणवीर- दीपिका, विराट- अनुष्का या बॉलिवूडमधील जोड्यांचा लग्नसोहळा परदेशात पार पाडला. त्याचप्रमाणे रणबीर आणि आलियादेखील 'फ्रान्स' मध्ये लग्न करणार असल्याची माहिती आय दिवाने दिली आहे. कलाकारांच्या लग्नसोहळ्याचं खास आकर्षण असतं ते म्हणजे डिझायन कपडे. रणबीर आणि आलिया यांनी सब्यसाची या डिझायनला पसंती दिली आहे. 

Image may contain: 4 people, people smiling, people standing

एका वर्षापासून आलिया आणि रणबीर डेट करत आहेत. सोनम कपूरच्या लग्नामध्ये या दोघांनी एकत्र एन्ट्री करत पहिल्यांदा पब्लिक अपिअरन्स केला. त्यांनतर हे दोघं डेट करत असल्याचं नक्की झालं. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रम्हास्त्र' चित्रपटामध्ये ते दोघं एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. आलिया आणि रणबीर अनेकदा एकत्र परदेशात फिरताना किंवा कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवताना दिसतात. दोघांकडून लग्नाविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नक्की हे दोघं लग्न करणार का? आणि कधी ? याची वाट पहावी लागेल.

Image may contain: 2 people, people smiling, people standing


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alia and ranbir getting married on this day in France