'मी कधीच तिच्यासारखी दिसू शकणार नाही'

गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई : 'ती एक खरंच सुंदर अभिनेत्री आहे. तिच्या दिसण्याबद्दल खरंतर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कधी कधी वाटतं मी अशी दिसेन का? तर मला माझंच उत्तर मिळतं मी कितीही काहीही केलं तरी तिच्याइतकी मी सुंदर कधीच दिसू शकणार नाही' ही वाक्यं आहेत अलिया भटची. आणि तिने स्तुती कुणाची केली आहे माहीती आहे का? ही स्तुती आहे दीपिका पदुकोनची. 

गेल्या काही दिवसांपासून दीपिकाचा पद्मावती चित्रपटातील लूक गाजतो आहे. प्रेक्षकांनी तिचा हा लूक उचलून धरला होता. अनेक सेलिब्रेटींनीही याचं कौतुक केलं. पण अलिया मात्र याला अपवाद आहे. कारण ती फक्त कौतुक करत नसून तिच्याइतकं खुद्द आपणही इतके सुंदर दिसणार नाही असं सांगितलं आहे. ती म्हणते, 'मी अजून हा चित्रपट पाहिला नाहीय. पण याचा ट्रेलर पाहिला आहे. त्यात दीपिका खुपच सुंदर दिसते आहे. मी तिला हे सांगितलंही. की तू माझी प्रेरणा आहेस. हा चित्रपट मला पाहायचा आहे. तो घरंदाजपणा दीपिकाने या चित्रपटात पुरेपूर जपला आहे'. 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील घुमर हे गाणं रीलीज झालं. त्यातही दीपिकाची छबी अनेकांनी वाखाणली आहे. 

पद्मावतीमधील घुमर गाणं पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Web Title: alia bhat says dipika padukone is beautiful in padmavati esakal news