आलिया-रणबीरचा रोमँटिक डान्स (व्हिडीओ)

Alia Bhatt and Ranbir Kapoor dance on ishq vala love song at zee cine awards
Alia Bhatt and Ranbir Kapoor dance on ishq vala love song at zee cine awards

सध्या बॉलिवूड जगतात सर्वाधिक चर्चा असेल तर आलिया आणि रणबीर या जोडीची. नुकताच एका अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने या गोड जोडीने आपल्या फॅन्सला सरप्राइज दिले. 

'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून आलिया भट आणि रणबीर कपूर हे एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची चर्चा सुरुच होती तोच आलिया-रणबीरच्या नात्याचे सिक्रेटही समोर आले. ते एकमेकांना डेट करत असल्याच्या केवळ चर्चाच रंगल्या नाहीत तर प्रत्येक सोहळ्याला त्यांच्या नेहमी जोडीने उपस्थितीवरुन या चर्चांना दुजोरा मिळाला. आताही या जोडीने पुन्हा एकदा लक्षं वेधून घेतले आहे. 'झी सिने अवॉर्ड' मध्ये आलिया-रणबीरने सोबत डान्स केला. 

आलियाच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातील 'इश्क वाला लव्ह' या गाण्यावर ही जोडी थिरकली. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या अवॉर्ड सोहळ्यासाठी आलियाने परिधान केलेल्या गाउनचीही सध्या फॅशन विश्वात बरीच चर्चा आहे. फ्लोरल प्रिंट असलेल्या या गाउनमध्ये आलिया एखाद्या बाहुली प्रमाणे दिसत होती. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com