'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात झळकणार आलिया भट आणि रणवीर सिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alia and ranvweer will come in koffee with karan

'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागात झळकणार आलिया भट आणि रणवीर सिंग

करण जोहरचा कॉफी विथ कारण हा शो सुरु होण्याआधीच चर्चेत आला आहे. हा शो सुरू होणार, होणार नाही की कायमचा बंद झाला अशा अनेक उलटसुलट चर्चा या शो बाबत केल्या जात आहेत. त्यात भर म्हणून बुधवारी करण जोहरने(Karan Johar) 'कॉफी विथ करण'(Koffee with karan) या आपल्या अत्यंत गाजलेल्या शो संदर्भात एक मोठी घोषणा केली. हा शो आता होणार नसल्याचे त्याने सांगितले आणि चाहते नाराज झाले.

हेही वाचा: यशोमती ठाकूर यांना भाजप कडून मुख्यमंत्री पदाची ऑफर,पण..

कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटींचे अनेक किस्से,सीक्रेट्स प्रेक्षकांसमोर आणले जातात. या कार्यक्रमाचे आतापर्यंत सहा सीजन झाले असून पुढचा सीजन कधी येणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. करणनं सोशल मीडियावर आपलं एक निवेदन शेअर करत त्यात 'कॉफी विथ करण' हा आपला शो बंद होणार असल्याचं म्हटलं होतं. ही पोस्ट वाचल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि काही काळातच ही अफवा असून लवकरच हा शो पुन्हा येत असल्याची आनंदवार्ता चाहत्यांना मिळाली.

हेही वाचा: साडी नेसली पण ब्लाउज विसरली.. प्राजक्ता माळीची भलतीच तऱ्हा..

करण चा शो बंद नाही तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. २०२१ मध्ये करणने 'कॉफी विथ करण' चे काही स्पेशल एपिसोड होस्ट केले होते,जे ओटीटी वरच दाखवण्यात आले होते. या शो मध्ये केवळ नेपोकिड्स येतात अशी टीकाही झाली होती. शिवाय यंदाच्या पर्वात कोणकोण येणार याबाबतही चर्चा सुरु आहे. यामध्ये दोन नावांवर शिक्कमोर्तब झाली आहे. नुकतीच विवाह बंधनात अडकलेली आलीया भट (alia bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंग (ranveer singh) हे पहिल्या भागात दिसणार आहेत. याबाबत एका माध्यमाने माहिती दिली असून पुढच्या आठवड्यात चित्रीकरण सुरु होणार असल्याचेही म्हंटले आहे.

Web Title: Alia Bhatt And Ranveer Singh Set To Shoot For Karan Johars Koffee With

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top