
आलियाने 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर केल्यापासून सध्या याच चित्रपटाची चर्चा पाहायला मिळतेय. पण, आलियाला दुखापत झाल्याने ती सध्या आराम करत आहे अशी माहिती समोर आली. तिच्या पाठीला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. पण, या सर्व अफवा असल्याचं आलियाने स्वत: सांगितलं आहे.
मुंबई : वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारी आलिया आता पुन्हा काय हटके घेऊन येते याची प्रतिक्षा नेहमीच तिच्या चाहत्यांना असते. तिने या अपेक्षांची पूर्ती करत 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय. या चित्रपटाची पहिली झलक लवकरात लवकर यावी अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती. या चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली असून शुटिंगपूर्वी आलियाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली. याच दुखापतीविषयी मात्र आलियाने काय ते सत्य सांगितलं आहे.
आलियाने 'गंगूबाई काठीयावाडी' या चित्रपटाचं पोस्टर शेअर केल्यापासून सध्या याच चित्रपटाची चर्चा पाहायला मिळतेय. पण, आलियाला दुखापत झाल्याने ती सध्या आराम करत आहे अशी माहिती समोर आली. तिच्या पाठीला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. पण, या सर्व अफवा असल्याचं आलियाने स्वत: सांगितलं आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने म्हणटलं आहे की, '' माझ्या दुखापतीविषयी येणारी बातमी खोटी आहे. मला काही झाले नसून मी व्यवस्थित आहे. मला झालेली दुखापत ही जुनी आहे. काही दिवसांपूर्वी मला दुखापत झाली होती आणि फक्त एक दिवस आराम केला. आजपासूनच मी शुटिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नका.''
आलियाचा बहुचर्चित सिनेमा 'ब्रम्हास्त्र' याचवर्षी रिलिज होणार आहे. अयान मुखर्जीच्या या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदाज रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. शिवाय यामध्ये अमिताभ बच्चनही असणार आहेत. महेश भट्ट यांच्या 'सडक 2' मध्येही ती दिसणार आहे. आलियाच्या चाहत्यांना मनोरंजनाची चांगलीच ट्रीट मिळणार आहे.