झऱ्याकाठी आलिया अन् रणबीर,'जिंदगी बन गये हो तुम'

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आज जन्मदिवस.
झऱ्याकाठी आलिया अन् रणबीर,'जिंदगी बन गये हो तुम'

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं चाहत्यांनी त्याला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय कित्येक बॉलीवूड कलाकारांनी देखील त्याचे अभिष्टचिंतन केले आहे. तो आणि त्याची गर्लफ्रेंड हे सध्या राजस्थानमध्ये असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आलियानं त्याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या त्याची चर्चा आहे. त्या फोटोला दिलेल्या कॅप्शननं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या रिलेशनशिपची चर्चा होती. ते आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. याबरोबरच आलियाचा (Alia Bhatt) महत्वकांक्षी प्रोजेक्ट गंगुबाई काठियावाडी देखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

मिशन काश्मीरमध्ये सोचो के झीलो का शहर हो, लहरो पे अपना एक घर हो नावाचं गाणं आहे. आलियानं जो फोटो शेय़र केला आहे तो पाहिल्यानंतर त्या गाण्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा तो फोटोच एकमेकांबद्दल खूप काही सांगून जातो. काही दिवसांपासून रणबीर आणि आलियाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या. ते रिलेशनशिपमध्ये आहे का, ते लग्न कधी करणार असे प्रश्न त्यांच्या चाहत्यांना प़़डले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. आगामी काळात रणबीरचे बिग बॅनर चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही कालावधीपासून त्याचा एकही चित्रपट आलेला नाही.

चाहत्यांना रणबीरच्या चित्रपटाचे वेध लागले आहे. रणबीरच्या खांद्यावर डोकं ठेवत एका झऱ्याकाठी काढलेला तो फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मुंबईपासून लांब एका निवांतक्षणी काढलेल्या त्या फोटोला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. त्यात चाहत्यांनी आता आम्हाला लग्नाची तारीख कधी सांगणार हा प्रश्न त्यांना विचारला आहे. यावेळी आलियानं रणबीरबद्दल मोजक्या शब्दांत आपल्या भावना लिहिल्या आहेत. तिनं लिहिलं आहे की, हॅप्पी बर्थ डे माय लाईफ. चाहत्यांनी त्या फोटोला लाईक्स करुन कमेंटही केल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते सध्या जोधपूरमध्ये आहेत. त्याठिकाणी ते वेडिंग लोकेशनशाठी गेले आहेत.

झऱ्याकाठी आलिया अन् रणबीर,'जिंदगी बन गये हो तुम'
'इन कॅमेरा' व्हावी सुनावणी हनी सिंगच्या मागणीवर कोर्ट म्हणाले...
झऱ्याकाठी आलिया अन् रणबीर,'जिंदगी बन गये हो तुम'
आलिया भट आणि रणबीर कपूर केंव्हा अडकणार लग्नाच्या बेडीत? रणबीरने केला खुलासा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com