आलिया भट्टचे प्राणिप्रेम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

आलिया भट्टचा 15 मार्चला वाढदिवस झाला. 24 वर्ष पूर्ण झालेल्या आलियाने बॉलीवूडमधील तिच्या खास मित्र मंडळींसाठी पार्टी ठेवली होती. शाहरूख खानपासून वरुण धवनपर्यंत अनेक बॉलीवूडकरांनी या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत अनेकांनी तिला अनेक गिफ्टस्‌ही दिली; पण यामध्ये सर्वांत खास गिफ्ट आलियाने स्वत:चे स्वत:लाच दिले. तिच्या वाढदिवशी आलियाने स्वतःला एक बोका गिफ्ट म्हणून घेतला. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या कुटुंबात नव्या सदस्याचे तिने स्वागत केले. तिने या गोड पांढऱ्या रंगाच्या मांजरीच्या पिलाचे नाव एडवर्ट भट्ट असे ठेवले आहे.

आलिया भट्टचा 15 मार्चला वाढदिवस झाला. 24 वर्ष पूर्ण झालेल्या आलियाने बॉलीवूडमधील तिच्या खास मित्र मंडळींसाठी पार्टी ठेवली होती. शाहरूख खानपासून वरुण धवनपर्यंत अनेक बॉलीवूडकरांनी या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीत अनेकांनी तिला अनेक गिफ्टस्‌ही दिली; पण यामध्ये सर्वांत खास गिफ्ट आलियाने स्वत:चे स्वत:लाच दिले. तिच्या वाढदिवशी आलियाने स्वतःला एक बोका गिफ्ट म्हणून घेतला. याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या कुटुंबात नव्या सदस्याचे तिने स्वागत केले. तिने या गोड पांढऱ्या रंगाच्या मांजरीच्या पिलाचे नाव एडवर्ट भट्ट असे ठेवले आहे. तिने या बोक्‍यासोबत आपला एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. आलियाची बहीण शाहीन हिनेही या गोड पिलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याचे नाव जाहीर केले. आलिया "बद्रीनाथ की दुल्हनिया' या तिच्या चित्रपटानंतर काही काळ सुटीवर जाणार आहे. तेव्हा एडवर्डशी तिला मनसोक्त खेळायला वेळ मिळणार आहे. सुटीवरून परतल्यानंतर आलिया ही अयान मुखर्जीच्या ड्रॅगन या चित्रपटाचे काम सुरू करणार आहे.  

Web Title: Alia Bhatt gets herself the cutest birthday gift ever