करण जोहरच्या घरी आलियाच्या बर्थ डेची जंगी पार्टी; बॉयफ्रेंड रणवीर कपूर मात्र गैरहजर

Aalia Bhatt
Aalia Bhatt

बॉलिवूडमधील चुलबूली अभिनेत्री आलिया भटचा आज 28 वा वाढदिवस आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी आणि आलियाच्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नविन कलांकारांसाठी गॉडफादर म्हणून ओळखला जाणारा चित्रपट निर्माता करण जोहरने आलियाच्या बर्थ पार्टीचे आयोजन केले होते. आलियाला चित्रपट सृष्टीमधील पहिली ब्रेक करणने दिला. त्याच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून आलियाने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.

आलियाचा बॉयफ्रेंन्ड रणवीर कपूरला कोरोनाची लागण झाल्यामुळे आलियाला वाढदिवस साजरा करायची इच्छा नव्हती. पण करण जोहरने तिच्यासाठी वाढदिवसानिम्मत रात्री 12 वाजता जोरदार सेलिब्रेशनचे आयोजन केले. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटींने या पार्टीला हजेरी लावली. दिग्दर्शक आयान मुखर्जी , मलायका अरोरा, अर्जुन कपूर, दिपीका पदूकोण, रणवीर सिंग,आदित्य कपूर या सेलिब्रेटींचे पार्टीला येतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी आलियाने ब्लॅक कलरचा वन पिस घातला होता. बॉलिवूडमधील रोमँटिक कपल मलायका आणि अर्जून एकत्र या पार्टीला आले.पण दिपीका आणि रणवीर मात्र वेगवेगळ्या गाडीमधून येताना दिसले.

रणवीर आणि आलियाचा 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या रियल लाइफ कपलची केमिस्ट्री चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आलियाच्या वाढदिवसानिम्मीत्त तिचा आर आर आर या चित्रपटातील लूक रिव्हील झाला आहे. या चित्रपटात आलिया सीता नावाच्या भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटात आलियासोबत राम चरण, ज्युनियर  एन टी रामा राव आणि अजय देवगण हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे  दिग्दर्शन प्रसिध्द दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी केले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com