रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर आलियाचं परखड उत्तर, खास फोटो शेअर करत केला खुलासा..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर सोबतच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आहे..अचानक आलेल्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी आलिया चांगलीच हैराण झालीये..आणि म्हणूनंच तीने रणबीर कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मौन सोडलंय..

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर सोबतच्या अफेअरमुळे चांगलीच चर्चेत आहे..दोघं अनेक दिवस एकमेकांना डेट करत असल्यानंतर अचानक आलेल्या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी आलिया चांगलीच हैराण झालीये..आणि म्हणूनंच तीने रणबीर कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चांवर अखेर मौन सोडलंय..

हे ही वाचा: शाहरुख खान म्हणतो येणा-या १०-१५ दिवसात...

आलिया भट्टने सोशल मिडीयावरुन तिच्या चाहत्यांना ही माहिती दिलीये..तिने तिचा स्वतःचा एक फोटो शेअर केलाय..या फोटोत आलिया तिच्या बाल्कनीमध्ये उभी राहून सूर्यास्ताकडे पाहतेय..मात्र तिच्या या फोटोपेक्षा फोटोला दिलेल्या कॅप्शननेच सगळ्यांना आकर्षित केलंय..आलियाने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये, घरी रहा आणि सूर्यास्त पहा असं म्हटलंय... इतकंच नाही तर या फोटोचं श्रेय देताना तिने, माझा ऑल टाईम फेव्हरेट फोटोग्राफर आर.के असं म्हटलंय...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

stay home &... watch the sunset  #stayhomestaysafe P.S - credit to my all time fav photographer RK 

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

आलियाच्या या फोटोवरुन सरळ सरळ हा फोटो रणबीर कपूरने क्लिक केल्याचं कळतंय..अशातंच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकमेकांसोबत चांगला वेळ घालवत आहेत आणि दोघेही त्यांची ही रिलेशनशिप खुलेआम एन्जॉय करताना दिसत आहेत..आलियाची ही प्रेमळ रिऍक्शन तिच्या चाहत्यांना चांगलीच आवडली आहे...याच फोटोवर कमेंट करत आलियाची बहीण शाहीन भट्ट हिने, याचा अर्थ तो केवळ आम्हा सगळ्यांचे फोटो खराब काढतो असं म्हटलंय..तर दुसरीकडे रणबीरची आई आणि अभिनेत्री नितू कपूरने याफोटोवर हार्टचं इमोजी पोस्ट केलंय..

Image result for aaliya ranbir spotted

मिळालेल्या माहितीनुसार या दोघांंचे कुटूंबिय लवकरंच दोघांच्या लग्नाची तयारी करणार आहेत..मात्र असं असलं तरी आलिया आणि रणबीरने याबाबत अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही..आलिया आणि रणबीर ब्रह्मास्त्र सिनेमातून पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत...हा सिनेमा आयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

best boys (& good girl) 

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

alia bhatt reaction on breakup with ranbir kapoor getting viral over social media  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alia bhatt reaction on breakup with ranbir kapoor getting viral over social media