Alia Bhatta marriage date : आलिया आई झाली अन् लोक शोधताहेत लग्नाची डेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Ranbir Marriage date

Alia Ranbir Marriage date : आलिया आई झाली अन् लोक शोधताहेत लग्नाची डेट

Alia Ranbir Marriage date : सेलिब्रीटीजच दिसणं, उठणं, बसणं, लग्न आणि मुलं अशा प्रत्येक गोष्टींची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ असते. त्यांना या बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्यात फार रस असतो. रविवारी आलियाची प्रसुती झाली अन् तिनं एका चिमुकलीला जन्म दिला.

अर्थातच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आलिया-रणबीरचं लग्न, त्याचे फोटोज फार गाजले होते. त्यांचं लग्न होणार हे चाहत्यांना ठाऊक असलं तरी तारीख ऐन वेळेवर जाहीर होत अगदी छोटेखानी हा सोहळा रंगला होता. त्यानंतर काही महिन्यातच आलियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ती आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली.

हेही वाचा: Alia Baby Girl: 'मुलगी झाली आलिया-रणबीरला'! पण करण जोहर का होतोय ट्रोल?

रविवारी आलियाची डिलीव्हरी झाल्यावर मात्र लेक झाल्याचा आनंद व्यक्त करतच एक वेगळीच बाब समोर आली. गुगलवर आलिया आणि रणबीरच्या लेकी पेक्षा त्यांच्या लग्नाची तारीख शोधण्यात लोकांना अधिक रस असल्याचं दिसत आहे. Alia Bhatta marriage date, Alia Ranbir wedding date, When Ranbir and Alia were get married? alia ranbir wedding day याचा सर्च अचानक टॉपवर पोहचला आहे.

हेही वाचा: Alia Bhatt Baby Girl: मुलगी झाली हो! आलियानं दिली गोड बातमी

Alia Bhatta marriage date

Alia Bhatta marriage date

आलिया रणबीरचं लग्न कधी झालं आणि त्यांना मुलं कितव्या महिन्यात झालं याचं समिकरण जुळवण्याच चाहत्यांना रस असल्याचं दिसून येत आहे.