पाकिस्तानची 'हानिया' की भारताची 'आलिया' कोण भारी? |Haniya Vs Aliya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aliya Bhatt Bollywood actress Haniya Aamir Pakistani

Haniya Vs Aaliya : पाकिस्तानची 'हानिया' की भारताची 'आलिया' कोण भारी?

Aliya Bhatt bollywood actress Haniya Aamir : टॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यांचा आरआरआर हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आहे. त्यांच्या चित्रपटातील नाटू नाटू हे गाणं चाहत्यांना भलतेच आवडले आहे. भारतात त्या गाण्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव तर केलाच याशिवाय परदेशातही त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

नाटू नाटू गाण्यावर पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा हानिया आमिरचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एका लग्नाच्या पार्टीत तिनं केलेला डान्स भारतीय प्रेक्षकांना देखील कमालीचा आवडला आहे. त्यांनी त्या डान्सवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. हे सगळे असताना दुसरीकडे भारताची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि पाकिस्तानच्या हानियाची तुलना होऊ लागली आहे.

Also Read -कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सोशल मीडियावर दोन्ही अभिनेत्रींमध्ये स्पर्धा आहे. कोण सरस....आता नेटकऱ्यांनी त्यावर दिलेली उत्तर मात्र भन्नाट आहे. कोणी आलियाच्या चित्रपटांची यादी, तिचं मानधन, तिची श्रीमंती यासाऱ्या गोष्टींविषयी चर्चा केली आहे. तर हानियाच्या चाहत्यांनी कमी वयात सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री असल्याचे म्हटले आहे.

हानिया ही पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तिच्या व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद अधिक आहे. नाटू नाटू गाण्यावरील तिचा डान्स चांगलाच व्हायरल झाला होता. दुसरीकडे आलियाचा चाहतावर्ग जगभर पसरला आहे. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक मानधन असणारी अभिनेत्री म्हणून आलियाचे नाव घेता येईल.