आलिया हॉलीवूडच्या वाटेवर?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नवी दिल्ली : अभिनेत्री आलिया भट्टने बॉलीवूडमध्ये फार कमी दिवसातच स्टारडम मिळवले. प्रेक्षकांच्या मनात घर केले. आता लवकरच ती संजय भन्साळींच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात झळकणार आहे. बॉलीवूडमध्ये नशीब अजमावल्यानंतर आलिया आता हॉलीवूडकडे वळण्याच्या विचारात आहे.

दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्राप्रमाणेच आलियालाही हॉलीवूडचे वेध लागले आहेत. आलिया सध्या लॉस एंजिलिसमध्ये असून ती इंटरनॅशनल सेलिब्रिटी मॅनेजरच्या शोधात आहे. हिंदीबरोबरच हॉलीवूड चित्रपट करत असताना दोन्ही चित्रपटांमध्ये तिला समतोल राखायचा आहे. आलिया तिच्या नव्या हॉलीवूड प्रोजेक्‍टबाबत कधी अधिकृत घोषणा करणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  

web title: Aliya on the way to Hollywood?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aliya on the way to Hollywood