Alka Kubal: अलका कुबल लेकीसोबत येरवडा तुरुंगात दाखल, हे आहे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alka kubal, alka kubal news, alka kubal movies,

Alka Kubal: अलका कुबल लेकीसोबत येरवडा तुरुंगात दाखल, हे आहे कारण

Alka Kubal News: अलका कुबल मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री. अलका कुबल या आजही मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. अलका कुबल या आजही रिऍलिटी शो, सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

अलका कुबल या नुकत्याच पुण्याच्या येरवडा तुरुंगात गेल्या होत्या. त्यामागे एक खास कारण आहे. अलका कुबल या थोरली लेक ईशानी सोबत येरवडा तुरुंगात गेल्या होत्या. काय आहे यामागचं कारण आम्ही तुम्हाला सांगतो.

(alka kubal with daughter ishani visit yerwada jail pune)

सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी गुरूवारी (दि. २५) पुण्यातील येरवडा महिला कारागृहाला (Yerwada Women's Jail) भेट दिली. यावेळी त्यांनी कारागृहातील महिलांशी संवाद साधला.

सुधारणा व पुनर्वसन या धोरणा अंतर्गत कारागृहातील कैद्यांकरीता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

गुरुवारी पुण्यातील भोई प्रतिष्ठान संस्थेच्या (pune) वतीने कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांचे संकल्पनेतून महिला कैद्यांकरता सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अलका कुबल यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात अलका कुबल यांनी महिला बंद्यांना महिला सबलीकरणबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी खचून न जाता जिद्दीने संकटांचा सामना करून परत नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करावी, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

महिलांना मानसिक आधार देत सर्व बंदी महिला आणि महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधला. यावेळी अलका कुबल यांच्यासोबत त्यांची थोरली मुलगी ईशानी सुद्धा उपस्थित होती.

अलका कुबल यांच्या उपस्थितीने येरवडा जेल मधील महिला कैद्यांना थोडाफार का होईना दैनंदिन आयुष्यातून विरंगुळा मिळाला.

टॅग्स :Marathi Actress