Alka Yagnik Birthday: बाबो! ओसामा बिन लादेनच्या घरी सापडल्या होत्या अलका याग्निक यांच्या कॅसेट्स.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alka yagnik cassettes found in osama bin laden chache

Alka Yagnik Birthday: बाबो! ओसामा बिन लादेनच्या घरी सापडल्या होत्या अलका याग्निक यांच्या कॅसेट्स..

Alka Yagnik Birthday: आपल्या सुमधूर आवाजाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अल्का याग्निक यांचा आज, २० मार्च रोजी ५७ वा वाढदिवस.

'प्यार की झंकार', 'मेरे अंगने में' यांसारख्या गाण्यांपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या अल्का यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आणि आजपर्यंत त्यांनी दोन हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.

केवळ हिंदीच नाही तर इतर विविध १५ भाषांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत. व्यावसायिक आयुष्यात अल्का याग्निक फारच यशस्वी ठरल्या. ९० च्या दशकातील लोकप्रिय गायिकां मध्ये त्यांचा आवर्जून उल्लेख होतो. त्यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे.

पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आतंकवादी ओसामा बिन लादेनही अलका यांचा 'जबरा फॅन' होता.. आज अलका यांच्या वाढदिवसा निमित्त जाणून घेऊया की खास बात..

(alka yagnik cassettes found in osama bin laden chache)

कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याने जगभरात हैदोस घातला होता. ओसामा आता या जगात नसला तरी आजही त्याच्या नावाची चर्चा आहे. ओसामाच्या दहशतवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी २०११ मध्ये अमेरिकन कमांडोंनी ओसामा बिन लादेन याला घरात घुसून मारले होते. पाकिस्तानातील एबटाबादमध्ये दडून बसलेल्या लादेनला अमेरिकेने चांगलाच धडा शिकवला होता.

त्यावेळी अमेरिकन तपास यंत्रणा सीआयएने त्यांच्या सर्व खोल्यांची झडती घेतली होती. त्यावेळी त्याठिकाणी त्यांना अलका यांच्या गाण्यांच्या अनेक सीडी - कॅसेट्स मिळाल्या होत्या. यावेळी तपास यंत्रणांनी याचा खुलासा केला होता.

सोबतच कुमार सानू, उदित नारायण यांच्याही गाण्यांच्या कॅसेट होत्या. त्यावेळी याची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे लादेनही बॉलिवूडच्या गाण्यांचा फॅन होता, असे बोलले गेले.

अलका यांनी १९८० साली 'प्यार की झंकार' या चित्रपटासाठी पहिले गाणे गायले होते. पण १९८८ साली आलेल्या 'तेजाब' चित्रपटातील 'एक दो तीन' या गाण्याने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्यासाठी अलका यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. बॉलीवुडमधील दिग्गज गायिकांमध्ये अलका याग्निक हे नाव अग्रस्थानी घेतले जाते.

टॅग्स :Alka Yagnik