#MeToo : संस्कारी नव्हे 'बलात्कारी' बाबू; आलोकनाथ यांच्यावर आरोप

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

1990 मध्ये 'तारा' या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी 'त्या'  अभिनेत्याचे नाव न घेता केवळ '20 वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्ही जगतातील सर्वात संस्करी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला होता.'

मुंबई : तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर #MeToo मोहिमेला पुन्हा सुरवात झाली आहे. यामुळे अनेक दिग्गज नावे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे बॉलिवूडचे संस्कारी बाबू अभिनेते अलोकनाथ! प्रसिद्ध दिग्दर्शक निर्मात्या विनता नंदा यांनी फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.

1990 मध्ये 'तारा' या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या विनता नंदा यांनी 'त्या'  अभिनेत्याचे नाव न घेता केवळ '20 वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्ही जगतातील सर्वात संस्करी अभिनेत्याने माझ्यावर बलात्कार केला होता.' असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. पण त्या अभिनेत्याचे नाव न घेता फक्त संस्कारी अभिनेता म्हणल्याने संशयाचे बोट अलोकनाथ यांच्याकडे असल्याचे स्पष्ट होत आहे. 

 

Web Title: allegations on aloknath indirectly by vinata nanda