Allu Arjun : अल्लु अर्जूनचं कौतूक करताना हेमा मालिनींची जीभ घसरली! 'बॉलीवूडचे अभिनेते तर...'

अल्लु अर्जुनचं कौतूक करताना हेमा मालिनी बॉलीवूडलाच विसरल्या आहेत. त्यांनी बोलताना बॉलीवूडचे अभिनेते आणि अल्लु अर्जुन यांची तुलना केली आहे.
Allu Arjun  Pushpa Hema Malini Reaction
Allu Arjun Pushpa Hema Malini Reaction

Allu Arjun Pushpa Hema Malini Reaction :साऊथचा सुपरस्टार अल्लु अर्जुनचा पुष्पा ज्यावेळी प्रदर्शित झाला तेव्हा त्यानं वेगळीच हवा तयार झाली होती. दरम्यान जेवढे बॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित झाले त्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. सगळीकडे अल्लु अर्जुनची चर्चा होती. पुष्पाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाचे प्रेक्षकांना वेध लागले आहे.

अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांनी अल्लु अर्जुनचा पुष्पा पाहिला. त्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यामध्ये त्यांनी बॉलीवूडचे अभिनेते आणि अल्लु अर्जुनची केलेली तुलना नेटकऱ्यांना काही आवडलेलं नाही.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अल्लु अर्जुनचं कौतूक करताना हेमा मालिनी बॉलीवूडलाच विसरल्या आहेत. त्यांनी बोलताना बॉलीवूडचे अभिनेते आणि अल्लु अर्जुन यांची तुलना केली आहे. त्या म्हणाल्या, मी पुष्पा द राईज पाहिला आणि मला खूप आनंद झाला. अल्लुनं त्यामध्ये जे काम केलं आहे त्याला तोड नाही. तो खूपच प्रतिभावान कलाकार आहेत. मला त्याचे काम खूपच आवडले. त्याचे डान्स स्टेप्सदेखील कौतूकास्पद होते. खासकरुन त्यानं लुंगी परिधान करुन केलेला डान्स अस्सल गावरान वाटतो आहे.

अल्लुनं त्या चित्रपटामध्ये केलेली भूमिका छानच आहे. मला कौतूक वाटते की त्यानं स्वताला त्या भूमिकेसाठी तयार केले आहे. आता आपले बॉलीवूडचे अभिनेत्यांना थोडीच असा लूक पाहायला आवडणार आहे, ते तर वेगळ्याच प्रकारचे स्टाईल फॉलो करतात. पण अल्लु अर्जुनची स्टाईल त्यांना आवडेल की नाही हा प्रश्नच आहे. अशा शब्दांत हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती.

मला आठवतं मी जेव्हा रझिया सुलतान नावाचा चित्रपट केला होता तेव्हा धर्मेंद्र यांना त्यात सावळे दाखवायचे होते. त्यांना ते नको होते. पण शेवटी दिग्दर्शकाची डिमांड म्हणून त्यांनी ते केले. असा संदर्भ हेमा मालिनी यांनी यावेळी दिला.

Allu Arjun  Pushpa Hema Malini Reaction
BJP Kerala Story Sponsor : ‘दि केरला स्टोरी’ साठी भाजपवर स्पॉन्सर शोधण्याची वेळ! निवडणुकांचा परिणाम

अल्लु अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याच्या पुष्पाच्या सिक्वेलविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. तसेच भुषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या एका चित्रपटामध्ये येणार आहे. अल्लु अर्जुनच्या पुष्पानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांना अल्लु अर्जुनच्या पुष्पानं जोरदार टक्कर दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com