एक बिहारी सौ पे भारी! अमरजीतचा आवाज ऐकला, सोनू भारावला! दिली भन्नाट ऑफर | Amarjeet Jaykar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amarjeet Jaykar

Amarjeet Jaykar : एक बिहारी सौ पे भारी! अमरजीतचा आवाज ऐकला, सोनू भारावला! दिली भन्नाट ऑफर

Amarjeet Jaykar social media viral singer Sonu Sood : सोशल मीडियावर सध्या बिहारचा अमरजीत जयकर हा ट्रेंडिंगचा विषय आहे. त्याच्या आवाजानं नेटकरी भारावून गेले आहेत. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींना देखील त्याच्या आवाजाची भुरळ पडली आहे. यासगळ्यात बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदनं जेव्हा अमरजीतचा आवाज ऐकला तेव्हा तो तर भारावून गेल्याचे दिसून आले.

अमरजीतच्या आवाजावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. काहींनी तर त्याला आगामी काळात बॉलीवूडमध्ये देखील तू गाशील असं म्हटलं आहे. संगीताचे कोणतेही शिक्षण न घेता अमरजीतच्या गाण्यानं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो ट्रेडिंगचा विषय आहे. यापूर्वी सोशल मीडियावर राणू मंडल आणि सहदेव दिरदो यांच्या गाण्याच्या व्हिडिओनं धुमाकूळ घातला होता.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

राणू मंडलला तर इंडियन आयडॉलमध्ये देखील बोलावण्यात आले होते. कच्चा बादाम फेम भुवन सहदेवला देखील वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये बोलावण्यात आले होते. पश्चिम बंगालमधील एका छोट्याशा गावात शेंगा विकण्याचे काम करणाऱ्या भुवननं आपल्या आवाजाच्या जोरावर पैसे मिळवले होते. आता अमरजीत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलीवूडचा सोनू सूद अमरजीतचं गाणं ऐकून भलताच भारावला आहे. त्यानं अमरजीतला थेट ऑफरच दिली आहे. काही दिवसांपूर्वी हातात ब्रश घेऊन अमरजीतनं दिल दे दिया है हे गाणं गायलं होतं. ते गाणं चाहत्यांना प्रचंड आवडलं होतं. त्यामुळे तो चर्चेत आला. लाखो नेटकऱ्यांपर्यत तो पोहचला. सोनूनं अमरजीतचा व्हिडिओ पाहून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं बिहारच्या अमरजीतचं कौतूक केलं आहे.

सोनू म्हणतो, एक बिहारी सौ पे भारी, सोनूनं त्याच्या आगामी फतेह नावाच्या चित्रपटामध्ये त्याला गाण्याची संधी दिली आहे. त्याची ही ऑफर ऐकून अमरजीतला तर आभाळ ठेंगणं झालं आहे. त्यानं सोनूला धन्यवाद दिले आहेत. येत्या २७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अमरजीत हा मुंबईमध्ये असणार आहे. त्यावेळी तो रेकॉर्डिंग करणार असल्याची चर्चा आहे.