‘द ट्रीप २’ मधून झळकेल अमायरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

अमायरा सध्या एकामागून एक चित्रपट करते आहे. ती सध्या राजकुमार राव आणि कंगनाबरोबर ‘मेंटल है क्‍या’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

श्‍वेता त्रिपाठी, लिझा हेडन, मल्लिका दुआ आणि सपना पाब्बी या चौघींनी केलेल्या ‘द ट्रीप’ या वेबसीरिजचा सीझन-२ येत आहे. फक्त सीझन-२ मध्ये लिझा हेडनच्याऐवजी अमायरा दस्तुर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

amayara

पहिल्या सीझनमध्ये आपल्या मैत्रिणीच्या बॅचलरेट पार्टीसाठी चौघी जणी एका रोडट्रीपवर निघतात आणि मलेशियाला जातात. ही ट्रीप त्यांच्यासाठी एक भावनात्मक रोलर कोस्टर ठरते. आता दुसरा भाग बहुतेक पहिला भाग जिथे संपला होता, तिथूनच पुढे कथा सांगितली जाईल.

या वेबसीरिजमध्ये लिझा हेडन एक म्युझिक कंपोझर बनण्याचे स्वप्न पाहत असते. तिच्या जागी आता अमायरा दिसणार आहे. अमायरा सध्या एकामागून एक चित्रपट करते आहे. ती सध्या राजकुमार राव आणि कंगनाबरोबर ‘मेंटल है क्‍या’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. तसेच तेलुगू चित्रपट ‘प्रस्थानम’च्या रिमेकमध्ये ती अली फजलबरोबर दिसणार आहे; तर तिने आणखी एक तमीळ चित्रपटही साईन केला आहे. आणि आता ‘द ट्रीप २’ या वेबसीरिजमधून अमायरा डिजिटल वर्ल्डमध्ये पहिल्यांदाच काम करणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amayara dastur introduced in the web series the trip 2