सलोनी लुथ्रा अमेरिकन चित्रपटात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 मे 2017

'मुन्नाभाई एमबीबीएस'सह काही चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या विभा गुलाटी यांनी हॉलीवूडमधील "द वेटिंग रूम'सारख्या अन्य काही चित्रपटांसाठीही योगदान दिले आहे.

'मुन्नाभाई एमबीबीएस'सह काही चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या विभा गुलाटी यांनी हॉलीवूडमधील "द वेटिंग रूम'सारख्या अन्य काही चित्रपटांसाठीही योगदान दिले आहे.

आपण लवकरच "द फॉरबिडन' हा अमेरिकन चित्रपट करणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री सलोनी लुथ्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीची भूमिका साकारत आहे. याबद्दल ती म्हणाली, "हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. या भूमिकेसाठी लागणाऱ्या सर्व घटकांबद्दल मला खात्री होती; पण मला अमेरिकन उच्चारांवर काम करावे लागले. त्यासाठी मी अमेरिकेत तीन आठवडे संशोधन केले.' 

Web Title: An America film for Salony Luthra !