तात्या म्हणाले,'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' 

 american president Donald trump mims viral on twitter
american president Donald trump mims viral on twitter

मुंबई -  महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा राजकारणावर चर्चा केली जाते त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' हा संवाद आठवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाच्या विधानसभा निवडणूकांमध्ये त्यांच्या तोंडी असलेला हा संवाद कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यांना अपयशाचा सामना करावा लागल्याने सोशल मीडियावर त्यांच्या संवादाचे मिम्सही व्हायरल झाले होते.

यंदा झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत पराभवाला सामो-या जाव्या लागलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर मिम्स व्हायरल झाले आहेत. त्यातून त्यांच्यावर टीका, तसेच काही शेलकी विशेषणे वापरुन त्यांची खिल्ली उडविण्यात आली आहे. भाडिप अर्थात भारतीय डिजिटल पार्टिने आपल्या सोशल अकाऊंटवरुन काही डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील काही मिम्स प्रसिध्द केले आहे. त्याला नेटक-यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

जे कॉमिक पोस्टर तयार करण्यात आले आहे त्यात डोनाल्ड यांचे छायाचित्र वापरुन त्याखाली मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन अशी एक कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच तात्या कोणता खेळून राहिले अशा गंमतीदार पोस्टमुळे त्याला प्रतिक्रियाही तितक्याच बोलक्या स्वरुपाच्या आल्या आहेत. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या निवडणुकींमध्ये (US Election) यंदाची निवडणूक ही वेगळी ठरली.

कोरोनाच्या संकटकाळात झालेला प्रचार, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मतमोजणीवरून केलेले आरोप आणि न्यायालयात घेतलेली धाव, मतमोजणीला झालेला विलंब यामुळे निवडणूक चांगलीच गाजली.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये बायडेन यांनी बाजी मारली आहे. बायडेन यांच्याकडे सध्या 284 इलक्टोरल मते असून ट्रम्प अद्याप 250 मतांवरच आहेत. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच बायडेन आघाडीवर होते. अखेर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. 2020 ची अमेरिकीतील अध्यक्षीय निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली.   

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com