
जेनिफर लोपेझ या अमेरिकन गायकीनं वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. त्या वयातही तिचं सौंदर्य लाजवाब आहे.
मुंबई - परदेशी गायक, अभिनेते यांना फॉलो करणा-यांची संख्या काही कमी नाही. त्यांना मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोअर्स असल्याचे दिसून आले आहे. यात दिग्गज सेलिब्रेटींचा समावेश आहे. अमेरिकन गायकांचा प्रचंड चाहता वर्ग भारतात आहे. त्यात मुख्यत भरणा तरुणांचा अधिक आहे. जेनिफर लोपेझ या अमेरिकन गायकीनं वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. त्या वयातही तिचं सौंदर्य लाजवाब आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिध्द झाला आहे. त्याला लाखोंच्या संख्येनं हीट्स मिळाले आहेत.
* वयाची 51 वर्षे पूर्ण केल्यानंतर जेनिफरनं स्वतला ज्या पध्दतीनं जपलं आहे ते पाहून चकित व्हायला होते. तिच्या नव्या गाण्यामुळे भलेही तिला ट्रोल केले जात असेल मात्र तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय राहवत नाही.
* सोशल मीडियावर जेनिफरनं भलताच हॉट व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामुळे सध्या तिच्या त्या व्हिडिओची चर्चा आहे.
* 'इन द मॉर्निंग' असे त्या व्हिडिओचे नाव असून जेनिफरनं त्या गाण्यामध्ये कुठलीच वेशभूषा केलेली नाही. विनाकपडे तिनं हे गाणं चित्रित केले आहे. अर्थात मोठा चाहता वर्ग असलेल्या जेनिफरला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत.
* जेनिफरच्या त्या गाण्यात तिच्या शरीराला पंख आले आहेत असे दाखविण्यात आले आहे. याविषयी तिनं असे लिहिले आहे की, मी तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त प्रेम केले. त्यामुळे ही वन साईडेड रिलेशनशिप ही काही डार्क प्रतिमांनी भरलेली आहे.
* जेनिफर आपल्या त्या व्हिडिओमध्ये म्हणते, तुम्ही कशालाही बदलू शकत नाही. जे आहे त्याचा स्वीकार करुन पुढे वाटचाल करत राहणे जास्त महत्वाचे आहे.
* तुम्ही फक्त स्वतला बदलु शकता. त्यामुळे आपल्या पंखांना जन्म द्या आणि अशा गोष्टींपासून लांब राहा ज्या तुम्हाला महत्वाच्या वाटत नाहीत. तसेच जे तुम्हाला महत्व देत नाहीत त्यांचाही फार विचार करु नका.
* जेनिफरच्या चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओला स्टनिंग आणि तिच्या अनेक गाण्यांपैकी एक असा मास्टरपीस असे म्हटले आहे.
* या व्हिडिओमध्ये ज्या पध्दतीनं जेनिफरनं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे ते बघण्यासारखे आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिनं वयाच्या 51 व्या वर्षी अशाप्रकारचे शुट केले आहे.
* जेनिफरच्या जीम ट्रेनरनं यापूर्वी तिच्या वर्कआऊटची माहिती दिली होती. त्यानं सांगितले होते की, ती 50 हँगिंग अॅब रेझ, 50 रोप क्रंचेस, 45 पाऊंड प्लेटच्यासह 50 इनक्लाइंड सीट अॅप्स करते.
* जेनिफरनं सेलिब्रेटी ट्रेनर डेव्हिड क्रिश्च याच्याबरोबर वर्कआऊट केले आहे. त्यानं एका मुलाखतीत असे सांगितले होते की, आपणही तिच्याबरोबर 30 ते 45 मिनिटांपर्यत वर्कआऊट करतो.